शेख मोहम्मद बिन झायद युएईच्या राष्ट्राध्यक्षपदावर

दुबई – शेख खलिफा बिन झायद अल नह्यान यांच्या मृत्यूनंतर शेख मोहम्मद बिन झायद अल नह्यान संयुक्त अरब अमिरातीचे (युएई) राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. 2014 सालली शेख खलिफा बिन झायद यांना हृदयविकाराचा धक्का आल्यानंतर, शेख मोहम्मद बिन झायद खऱ्या अर्थाने युएईचा कारभार पाहत होते. त्यामुळे युएईतील हे सत्तांतर अतिशय सुलभतेने पार पडले. यामुळे युएईच्या धोरणातील सातत्य कायम राहणार आहे.

शेख मोहम्मद बिन झायद युएईच्या राष्ट्राध्यक्षपदावरएबीझेड म्हणून ख्यातनाम असलेले शेख मोहम्मद बिन झायद सुधारणावादी, प्रगतीशील नेते मानले जातात. त्यांनी युएईला आधुनिकतेच्या दिशेने पुढे नेणारे निर्णयघेतले आहेत. इंधनसंपन्न असलेल्या युएईला पुढच्या काळात केवळ इंधनाच्या निर्यातीवर अवलंबून राहता येणार नाही, हे लक्षात शेख मोहम्मद बिन झायद यांनी देशाच्या धोरणात आवश्यक बदल केले आहेत. यामुळे अंतराळापासून ते आयटी क्षेत्रात युएई इतर देशांबरोबर सहकार्य वाढवित असल्याचे दिसत आहे.

याबरोबरच सौदी तसेच इतर आखाती देशांबरोबरील युएईचे सहकार्य अधिकाधिक दृढ करण्याचा निर्णय शेख मोहम्मद बिन झायद यांनी घेतला. भारतासारख्या देशाबरोबर सर्वच क्षेत्रातील सहकार्य वाढवून युएईने भारतात प्रचंड प्रमाणात गुंतवणुकीचाही निर्णय घेतला आहे. यामागे शेख मोहम्मद बिन झायद यांची दृष्टी असल्याचे मानले जाते. अब्राहम करारात सहभागी होऊन इस्रायलला मान्यता देण्याचा क्रांतिकारी निर्णयही मोहम्मद बिन झायद यांच्याच नेतृत्त्वाखाली युएईने घेतला आहे.

भारत, अमेरिका आणि इस्रायलबरोबरच्या पश्चिम आशियाई ‘क्वाड’मध्ये युएईने सहभाग घेतला असून यामुळे मोहम्मद बिन झायद यांचे नेतृत्त्व अधिकच ठळकपणे जगासमोर आले आहे. अशा परिस्थितीत एमबीझेड यांच्याकडे अधिकृतरित्या युएईचे नेतृत्त्व आल्याने, युएईच्या धोरणांमध्ये सातत्य कायम राहणार आहे. त्याचा फार मोठा लाभ आखाती क्षेत्राला मिळेल. यामुळे पुढच्या काळात युएईचे आर्थिक, राजकीय व सामरिक महत्त्व अधिकच वाढणार आहे.

leave a reply