चीन, युएईतील कंपन्यांवर अमेरिकेचे कठोर निर्बंध

वॉशिंग्टन – इराणच्या पेट्रोकेमिकल्स क्षेत्राशी संबंधित कंपन्यांवर अमेरिकेने नवे कठोर निर्बंध लादले आहेत. अमेरिकेच्या कोषागार विभागाने चीन, युएई तसेच हाँगकाँगमधील कंपन्यावर ही कारवाई केली आहे. अमेरिकेने गेल्या दहा दिवसात तिसऱ्यांदा इराणशी संबंधित व्यक्ती आणि कंपन्यांवर निर्बंध टाकले आहेत.

अमेरिकन कोषागार विभागातील दहशतवादआणि आर्थिक हेरगिरी विभागाचे उपमंत्री ब्रायन नेल्सन यांनी या कारवाईची घोषणा केली. इराणबरोबर नव्याने अणुकरार करण्यासाठी अमेरिकेचे राजनैतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. पण हा करार पूर्णत्वास जाईपर्यंत 2015 सालच्या कराराचे उल्लंघन करणाऱ्या इराणवर आणि संबंधितांवर निर्बंधांची कारवाई होत राहील, असे नेल्सन यांनी फटकारले.

us-treasuryयानुसार इराणकडून पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल्स उत्पादने खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. याअंतर्गत चीन, युएई आणि हाँगकाँगमधील कंपन्यांचा समावेश असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले. यामध्ये चिनी नागरिक जिनफेंग गाओ याचा देखील समावेश आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या कोषागार विभागाने रशिया, चीनमधील इराणवंशिय उद्योजक व सहाय्यकांवर निर्बंधांची कारवाई केली होती.

leave a reply