वॉशिंग्टन – 2015 सालचा अणुकरार पुनर्जीवित करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचा दावा बायडेन प्रशासनानने काही आठवड्यांपूर्वी केला होता. पण ही चर्चा फिस्कटली असून पुढे जाण्याची शक्यता नसल्याची माहिती बायडेन प्रशासनानेच अमेरिकन काँग्रेसमध्ये दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे.
दोन आठवड्यांपूर्वी ‘फॉरिन अफेअर्स कमिटी’समोर बायडेन प्रशासनाने इराणबरोबरच्या चर्चेची माहिती दिली. यासंदर्भातील काही तपशील अमेरिकन संसदेतील प्रतिनिधी डॅरेल इस्सा यांनी स्थानिक वर्तमानपत्राशी बोलताना उघड केले. यामध्ये इराण आपल्या मागण्यांवर अडून बसल्याचे बायडेन प्रशासनाने सांगितले. 2015 सालच्या अणुकरारात इराणला अजिबात बदल नको असल्याची टीकाही बायडेन प्रशासनाने केल्याचे इस्सा यांनी सांगितले.
ब्रिटन, जर्मनी व फ्रान्स या अणुकरारासाठी इराणशी वाटाघाटी करणाऱ्या युरोपिय देशांनीही सध्या तरी अणुकराराची शक्यता मागे पडल्याचे जाहीर केले होते.