पाकिस्तानने अमेरिकेतील आपली मालमत्ता विक्रीला काढली

us pak embassyवॉशिंग्टन – आर्थिक संकटाची झळ बसू लागलेल्या पाकिस्तानने अमेरिकेतील आपली मालमत्ता विक्रीस काढली आहे. वॉशिंग्टनमधील पाकिस्तानच्या दूतावासाने स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये तशी जाहिरात दिली. पण दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या पगाराचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचा खुलासा पाकिस्तानच्या दूतावासाने केला.

पाकिस्तानवरील कर्जाचे ओझे वाढत चालले असून सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थकीत असल्याच्या बातम्या गेल्या वर्षभरापासून समोर येत आहेत. पाकिस्तानच्या मंत्रालयासह परदेशातील दूतावासांमधील सामान्य स्तरावरील कर्मचाऱ्यांचा पगार रखडल्याचा दावा केला जातो. सोशल मीडियावर यासंबंधी बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर पाकिस्तानला यातून माघार घ्यावी लागली होती. अशा परिस्थितीत, अमेरिकेतील पाकिस्तानच्या दूतावासाने राजनैतिक मालमत्ता विक्रीस काढण्याची जाहीरात प्रसिद्ध केली.

यामध्ये वॉशिंग्टनमधील दूतावासाची जूनी किंवा नव्या इमारतीचा समावेश नसल्याचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पण दूतावासाची जूनी इमारत विक्रीसाठी काढली जाऊ शकते, असा दावा केला जातो.

हिंदी

leave a reply