रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष मेदवेदेव्ह चीनच्या दौऱ्यावर

medvedev jinpingबीजिंग/मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन बेलारुस दौऱ्यावर असतानाच माजी राष्ट्राध्यक्ष व सिक्युरिटी कौन्सिलचे उपाध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह चीनच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. मेदेवेदव्ह यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली असून युक्रेन युद्ध व द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा केल्याची माहिती रशियन माध्यमांनी दिली.

‘आम्ही रशिया व चीनमधील सत्ताधारी पक्षांमधील सहकार्यावर चर्चा केली. त्याचबरोबर रशिया-चीन धोरणात्मक भागीदारी, द्विपक्षीय संबंध, अर्थव्यवस्था व औद्योगिक उत्पादनाच्या मुद्यांवरही बोलणी झाली. आंतरराष्ट्रीय मुद्यांवर झालेल्या चर्चेत युक्रेन संघर्षाचाही समावेश होता’, अशी माहिती रशियन नेते मेदवेदेव्ह यांनी दिली. युक्र्रेनमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियाने चीनबरोबरील सहकार्य मोठ्या प्रमाणात वाढविले असून राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन व परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांच्यासह इतर वरिष्ठ नेते सातत्याने चिनी नेत्यांशी संपर्कात आहेत. चीनने रशियाला युद्धविषयक सहकार्य पुरविल्याचे आरोपही पाश्चिमात्य देशांनी केले आहेत.

leave a reply