फिलिपाईन्स थिटू बेटावरील लष्करी सज्जता वाढविणार

Philippine_president_Ferdinand_Marcosमनिला – चीनने वादग्रस्त साऊथ चायना सीमधील बेटांवरील सैन्यतैनाती वाढविण्याचे आदेश दिले आहेत. चीनच्या या लष्करी हालचालींमुळे सावध झालेल्या फिलिपाईन्सने देखील येथील थिटू बेटावरील लष्करी सज्जता वाढविणार असल्याचे जाहीर केले आहे. फिलिपाईन्सच्या सागरी हद्दीवर चीनला अधिकार गाजवू देणार नसल्याची घोषणा फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी याआधीच केली होती.

दोन दिवसांपूर्वी चीनने साऊथ चायना सीच्या क्षेत्रातील स्प्रार्टले द्विपसमुहांमधील बेटांवर सैन्यतैनाती वाढविण्याचे आदेश आपल्या लष्कराला दिले होते. त्याचबरोबर चीनच्या लष्कराने येथील एका बेटाचे कृत्रिम विस्तारीकरण सुरू केल्याचे सॅटेलाईट फोटोग्राफ्सही प्रसिद्ध झाले होते. संपूर्ण साऊथ चायना सीवर आपला अधिकार सांगणाऱ्या चीनच्या या लष्करी हालचलींमुळे आग्नेय आशियाई देश सावध झाले होते.

चीनच्या या लष्करी हालचालींवर बारीक नजर ठेवणाऱ्या फिलिपाईन्सने देखील येथील थिटू बेटावरील आपली लष्करी सज्जता वाढविण्याची घोषणा केली.

leave a reply