इराकमधील हवाई कारवाईत ‘आयएस’चे तीन दहशतवादी ठार

बगदाद – इराकच्या हवाईदलाने दियाला प्रांतात केलेल्या कारवाईत ‘आयएस’चे तीन दहशतवादी ठार झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून इराकच्या सुरक्षा यंत्रणेने आयएसविरोधात छुपी मोहीम छेडली होती. पण पहिल्यांदाच आयएसविरोधात हवाई कारवाई हाती घेतल्याचे दिसत आहे.

इराकमधील हवाई कारवाईत ‘आयएस’चे तीन दहशतवादी ठारआयएसचे दहशतवादी इराकमध्ये पुन्हा डोके वर काढू लागल्याचा दावा केला जातो. इराकी जनता व सुरक्षा यंत्रणेवरील या दहशतवादी संघटनेचे हल्ले वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर इराकच्या लष्कराने आयएसविरोधात छुपी मोहीम छेडली होती. इराकचे लष्कर गुरिला युद्धतंत्राचा वापर करून आयएसच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करीत होते. इराकच्या पूर्वेकडील दियाला प्रांतात आयएसच्या दहशतवाद्यांनी आपला तळ तयार केला होता. या पार्श्वभूमीवर इराकच्या लष्कराने शुक्रवारी आयएसच्या तळावर हल्ले चढविले. यामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती इराकच्या लष्कराने दिली.

दरम्यान, अमेरिकेने इराकमधून पूर्ण सैन्यमाघार घ्यावी, अशी मागणी इराकच्या सरकारने केली आहे. पण इराकमधील आयएसचा प्रभाव वाढत चालल्याचे सांगून बायडेन प्रशासनाने इराकमधील अमेरिकी जवानांची तैनाती वाढविण्याचे संकेत दिले आहेत.

हिंदी

 

leave a reply