अमेरिका फिलिपाईन्समध्ये चार नवे लष्करी तळ उभारणार

- तैवानजवळच्या लष्करी तळाचा समावेश

मनिला/वॉशिंग्टन – अमेरिकेच्या विनाशिकेच्या ‘साऊथ चायना सी’मधील पॅरासेल द्विपसमुहांच्या हद्दीतील गस्तीनंतर चीनने गंभीर परिणामांचा इशारा दिला. साऊथ चायना सीच्या क्षेत्रात चीनबरोबर हा तणाव निर्माण झालेला असताना, अमेरिकेने फिलिपाईन्ससोबत लक्षवेधी करार केला आहे. लवकरच अमेरिका फिलिपाईन्सममधील चार लष्करी तळांवर आपले सैन्य तैनात करणार आहे. फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष मार्कोस ज्युनिअर यांनी याची माहिती उघड केली. फिलिपाईन्सने अमेरिकेला पुरविलेल्या चार पैकी एक तळ तैवानपासून जवळ असल्याचा दावा केला जातो. अमेरिका व तैवानमधील लष्करी सहकार्यामुळे आधीच बेचैन असलेल्या चीन यामुळे कमालीचा अस्वस्थ होऊ शकतो.

अमेरिका फिलिपाईन्समध्ये चार नवे लष्करी तळ उभारणार - तैवानजवळच्या लष्करी तळाचा समावेशअमेरिका फिलिपाईन्समध्ये चार नवे लष्करी तळ उभारणार - तैवानजवळच्या लष्करी तळाचा समावेशगेल्या काही दिवसांपासून चीन व फिलिपाईन्समधील राजनैतिक स्तरावर तणाव निर्माण झाला आहे. फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रातील चीनच्या नौदलाच्या प्रक्षोभक कारवाया अजिबात मान्य करणार नसल्याचे राष्ट्राध्यक्ष मार्कोस ज्युनिअर यांच्या सरकारने खडसावले आहे. चीनच्या नौदलाकडून फिलिपाईन्सच्या तटरक्षकदलाच्या बोटींवर लेझर रोखले जाते, त्यांच्या दिशेने धोकादायक प्रवास केला जातो, याचा उल्लेख करून राष्ट्राध्यक्ष मार्कोस ज्युनिअर यांनी चीनवर टीका केली होती. चीनच्या नौदलाकडून असलेला हा धोका अधिकाधिक गुंतागुंतीचा आणि अंदाज न बांधता येणारा असल्याचे फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले होते. याप्रकरणी फिलिपाईन्सने चीनच्या राजदूतांना समन्सही बजावले होते.

अशा परिस्थितीत अमेरिका व फिलिपाईन्समध्ये नवा लष्करी करार संपन्न झाल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष मार्कोस ज्युनिअर यांनी उघड केली. गेल्या महिन्यात पार पडलेल्या ‘एन्हान्स्ड् डिफेन्स कोऑरेशण ॲग्रीमेंट’ अंतर्गत फिलिपाईन्सने अमेरिकेला चार लष्करी तळ पुरविले आहेत. अमेरिकेबरोबरची बोलणी पूर्ण होईपर्यंत यांचे तपशील देण्यात येणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष मार्कोस यांनी स्पष्ट केले. पण फिलिपाईन्सच्या पलावन द्विपसमुहाजवळ यातील काही तळांचा समावेश असेल, असे संकेत फिलिपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षांनी दिले आहेत. अमेरिका फिलिपाईन्समध्ये चार नवे लष्करी तळ उभारणार - तैवानजवळच्या लष्करी तळाचा समावेशयामुळे फिलिपाईन्सची सुरक्षा मजबूत होईल, असा दावा राष्ट्राध्यक्ष मार्कोस यांनी केला. तर यातील एक तळ तैवानजवळ व चीनबरोबरच्या वादग्रस्त सागरी क्षेत्रात असल्याचा दावा केला जातो.

‘साऊथ चायना सी’मधील ‘नाईन डॅश लाईन’च्या क्षेत्रावर चीनने आपला दावा सांगितला आहे. व्हिएतनाम, फिलिपाईन्स व मलेशियाचे सागरी तसेच हवाई क्षेत्रावरील हक्क चीनला अजिबात मान्य नाहीत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या मुद्यावर फिलिपाईन्सच्या बाजूने दिलेला निकालही चीनने पायदळी तुडविला आहे. त्याचबरोबर आपल्या परवानगीशिवाय कुठल्याही देशाच्या लष्करी तसेच प्रवासी विमानाने तसेच युद्धनौकांनी या क्षेत्रातून प्रवास करू नये, असे चीनचे म्हणणे आहे.

अशा परिस्थितीत, फिलिपाईन्सने अमेरिकेला चार लष्करी तळ पुरविले आहेत. त्यातही एक लष्करी तळ तैवानच्या आखातापासून जवळ आहे. तैवान देखील आपलाच सार्वभौम भूभाग असल्याचा दावा करणाऱ्या चीनसाठी अमेरिका व फिलिपाईन्समधील हा करार चपराक ठरत आहे. यावर चीनकडून प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

leave a reply