इस्रायलने ‘रेड लाईन’ ओलांडण्याचा मुर्खपणा केला तर युद्ध भडकेल

- हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाची धमकी

बैरूत – इराण व सौदी अरेबियामध्ये संबंध सुरळीत करण्यासाठी सुरू असणाऱ्या हालचालींमुळे आत्मविश्वास वाढलेल्या हिजबुल्लाहने इस्रायलला नवी धमकी दिली. ‘अल-अक्सा ही आमच्यासाठी रेड लाईन आहे. इस्रायलने ही रेड लाईन ओलांडण्याचा मुर्खपणा केलाच तर युद्ध भडकेल’, असे हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्ला याने बजावले आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षभरातील घडामोडींमुळे इस्रायलचा या क्षेत्रातील प्रभाव ओसरला असून येत्या काळात इस्रायल अधिक शक्तीहिन होऊन आमचा प्रभाव अधिकच वाढेल, असा दावा नसरल्लाने केला आहे.

इस्रायलने ‘रेड लाईन’ ओलांडण्याचा मुर्खपणा केला तर युद्ध भडकेल - हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाची धमकीआठवड्यापूर्वी गाझापट्टी आणि लेबेनॉनमधील दहशतवाद्यांनी इस्रायलवर तब्बल ७८ रॉकेट्सचा मारा केला. एकट्या लेबेनॉनमधून ४४ रॉकेट्स डागण्यात आले होते. यानंतर इस्रायलने गाझापट्टी व लेबेनॉनवर हवाई हल्ले चढवून दहशतवाद्यांची ठिकाणे नष्ट केल्याची घोषणा केली होती. पण लेबेनॉनमधील इराणसंलग्न हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरल्ला याने हा दावा धुडकावला. इस्रायलच्या हल्ल्यात केळीची झाडेच कोसळली, असे सांगून नसरल्ला याने इस्रायलच्या कारवाईची खिल्ली उडवली.

त्याचबरोबर जेरूसलेममधील प्रार्थनास्थळ हे आपल्यासाठी ‘रेड लाईन’ अर्थात मर्यादा रेषा असल्याचे सांगून इस्रायलने ही मर्यादा रेषा ओलांडली तर मोठे युद्ध भडकेल, असे हिजबुल्लाहच्या प्रमुखाने धमकावले. इस्रायलने ‘रेड लाईन’ ओलांडण्याचा मुर्खपणा केला तर युद्ध भडकेल - हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाची धमकीत्याचबरोबर लेबेनॉनच्या दक्षिणेकडील भागात इस्रायलने चढविलेल्या हल्ल्यांना तितकेच जोरदार प्रत्युत्तर मिळेल, असा इशाराही नसरल्ला याने दिला. इस्रायलचे लष्कर हिजबुल्लाह तसेच गाझापट्टीतील हमासचे काहीच वाकडे करू शकत नसल्याचा दावा हिजबुल्लाहच्या प्रमुखाने बैरूतमध्ये प्रसारीत झालेल्या व्हिडिओद्वारे केला आहे.

तर दोन वर्षांपूर्वी अमेरिकेने मध्यस्थी केलेल्या इस्रायल-अरब देशांमधील अब्राहम कराराला हादरे बसत असल्याचे नसरल्ला म्हणाला. इराणच्या विरोधात अरब-इस्रायली अशी आघाडी उभारण्यासाठी प्रयत्न झाले. इस्रायलने ‘रेड लाईन’ ओलांडण्याचा मुर्खपणा केला तर युद्ध भडकेल - हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाची धमकीपण यासाठीचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडी जबाबदार आहेत. यामुळे इस्रायलविरोधी गट अधिकाधिक मजबूत होत असल्याचे नसरल्ला याने सांगितले. अमेरिकेचा या क्षेत्रातील प्रभाव संपुष्टात येत असून इराण आणि सौदी अरेबियातील संबंध मजबूत होऊ लागले आहेत, याकडे नसरल्लाने लक्ष वेधले.

इतकेच नाही तर सिरिया-अरब देश असे संबंधही सुधारत चालले आहेत. तर दुसरीकडे इस्रायलमध्ये गृहयुद्ध पेटले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या तणावामुळे इस्रायलमध्ये फूट पडली असून इथे रक्तपात होण्याची दाट शक्यता होती. सध्या इस्रायलमधील गृहयुद्ध टळले असले तरी येथील तणाव संपलेला नाही, असा इशारा नसरल्ला याने दिला. तसेच गेल्या वर्षभरातील घडामोडींवरुन अमेरिकेने इस्रायलची साथ सोडल्याचे दिसते, असा दावा देखील हिजबुल्लाहच्या प्रमुखाने केला.

हिंदी English

 

leave a reply