चीनच्या उपग्रहाचे सुटे भाग तैवानच्या हद्दीत कोसळले

- अमेरिकन विनाशिकेची गस्त

तैपेई – चीनने अंतराळात प्रक्षेपित केलेल्या उपग्रहाचे सुटे भाग थेट तैवानची राजधानी तैपेईजवळच्या सागरी हद्दीत कोसळले. यानंतर काही तासासाठी तैवानला हवाईहद्दीतील प्रवासी विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली होती. चीनने ‘नो फ्लाय झोन’मधून उपग्रहाचे प्रक्षेपण केल्यामुळे हा प्रकार घडल्याची टीका तैवान करीत आहे. दरम्यान, चीनच्या उपग्रह चाचणीमुळे तैवानच्या आखातात तणाव निर्माण झालेला असताना, अमेरिकन विनाशिकेने तैवानच्या हद्दीजवळून गस्त घातली.

चीनच्या उपग्रहाचे सुटे भाग तैवानच्या हद्दीत कोसळले - अमेरिकन विनाशिकेची गस्तरविवारी उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याची घोषणा चीनने केली होती. यासाठी ‘ईस्ट चायना सी’च्या हवाई हद्दीतील विमानांची उड्डाणे २७ मिनिटांसाठी पुढे ढकलण्याची सूचना चीनने आपल्या ‘नोटॅम’मध्ये केली होती. पण आपला हा उपग्रह ‘नो फ्लाय झोन’ अर्थात तैवानच्या हवाईहद्दीतून जाणार असल्याची माहिती चीनने दडवून ठेवली होती. तैवानच्या सरकारने यावर नाराजी व्यक्त केली.

वायव्येकडील जिउक्वान तळावरुन प्रक्षेपित केलेला हा उपग्रह अंतराळात स्थिरावल्याची घोषणा चीनने केली. पण प्रक्षेपणानंतर तैवानच्या हद्दीत शिरलेल्या या उपग्रहाचे काही सुटे भाग तैपैईच्या उत्तरेकडील समुद्रात कोसळले. यामुळे तैवानमध्ये काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. तैवानने काही काळासाठी विमानांची उड्डाण पुढे ढकलली. गेल्या आठवड्यात चीनने तैवानच्या हद्दीत जवळपास २०० वेळा लढाऊ विमाने रवाना करुन आपल्या लष्कराला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर चीनच्या उपग्रहाच्या सुट्या भागामुळे या क्षेत्रातील तणाव वाढला होता. त्यातच अमेरिकेच्या ‘युएसएस मिलियस’ विनाशिकेने तैवानच्या सागरी हद्दीतून गस्त पूर्ण करत चीनला नवी चिथावणी दिली.

हिंदी

 

leave a reply