अमेरिकी डॉलरला चीनच्या युआनपासून धोका नाही

- अमेरिकेच्या माजी अर्थमंत्र्यांचा दावा

वॉशिंग्टन/बीजिंग – ‘चीनचे शेअरबाजार व भांडवली बाजारपेठ विश्वासार्ह किंवा स्थिर नाही. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात आपली गुंतवणूक सुरक्षित व राखून ठेवण्यासाठी या देशाचा विचार करतील का, याबाबत शंका आहे. ही बाब लक्षात घेतली तर चीनचे युआन हे चलन अमेरिकी डॉलरसाठी धोका ठरु शकत नाही’, असा दावा अमेरिकेचे माजी अर्थमंत्री लॅरी समर्स यांनी केला. गेल्या काही महिन्यात अमेरिकी डॉलरचे ‘रिझर्व्ह करन्सी’ म्हणून असलेले स्थान धोक्यात आल्याचे इशारे अर्थतज्ज्ञ तसेच विश्लेषकांकडून देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर समर्स यांचा दावा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

अमेरिकी डॉलरला चीनच्या युआनपासून धोका नाही - अमेरिकेच्या माजी अर्थमंत्र्यांचा दावागेल्या काही वर्षात अमेरिका आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरचा शस्त्रासारखा वापर करीत आहे. रशिया, चीन, इराण, व्हेनेझुएला, उत्तर कोरिया या देशांवर अमेरिकेने निर्बंध लादले असून डॉलरच्या व्यवहारांवर बंदी घातली आहे. यामुळे या देशांकडून डॉलरला पर्याय शोधण्यासाठी जोरदार हालचाली सुरू असून द्विपक्षीय व्यापारात त्यांनी राष्ट्रीय चलनांच्या वापरावर भर दिला आहे. त्याचवेळी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून डॉलरबाबत घेतल्या जाणाऱ्या निर्णयांमुळे जगातील अनेक देश नाराज असून त्यांनी अमेरिकी डॉलरचा वापर कमी करून पर्यायी चलनांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे.

दुसऱ्या बाजूला चीनने आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेच्या प्रभावाला धक्का देण्यासाठी धडपड सुरू केली असून त्यात डॉलरला पर्यायी चलन हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. गेल्या दशकभरात चीनने अमेरिकी डॉलरला पर्याय म्हणून आपले युआन चलन आक्रमकपणे पुढे रेटण्यास सुरुवात केली आहे. जगातील अनेक आघाडीच्या देशांबरोबर युआनच्या वापरासाठी करार करण्यात येत आहेत. अमेरिकी डॉलरला चीनच्या युआनपासून धोका नाही - अमेरिकेच्या माजी अर्थमंत्र्यांचा दावायात रशिया व ब्राझिलसह युरोप, आफ्रिका, लॅटिन अमेरिका तसेच आशिया खंडातील देशांचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच इंधन उत्पादक देश असणाऱ्या युएईने युआनमध्ये इंधनव्यवहार केल्याचे वृत्त समोर आले होते.

यामुळे युआनचा आंतरराष्ट्रीय व्यापार तसेच इतर व्यवहारांमधील टक्का हळुहळू वाढू लागला आहे. जगातील आघाडीचे अर्थतज्ज्ञ असणाऱ्या नुरिअल रुबिनी यांच्यासह अनेक तज्ज्ञांनी तसेच विश्लेषकांनी युआन डॉलरला आव्हान देऊ शकतो, अशी भाकिते केली वर्तविली होती. समर्स यांनी मात्र ही शक्यता फेटाळली.

चीनच्या राजवटीकडून भांडवली बाजारपेठ व इतर यंत्रणांवर असलेल्या नियंत्रणाकडे समर्स लक्ष वेधले. अमेरिकी डॉलरला चीनच्या युआनपासून धोका नाही - अमेरिकेच्या माजी अर्थमंत्र्यांचा दावात्याचवेळी सध्या चीनमधून भांडवल बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू असल्याची जाणीवही माजी अर्थमंत्र्यांनी करून दिली.

अमेरिकी डॉलरला युआनकडून धोका नसला तरी अंतर्गत पातळीवर घेण्यात येणाऱ्या निर्णयांचे परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात, असे समर्स यांनी यावेळी बजावले. डॉलरने आपले राखीव चलन म्हणून असलेले स्थान गमावले तर त्यामागे अमेरिकेचा जगातील घटलेला प्रभाव हे एकमेव कारण असेल, असा दावा समर्स यांनी केला.

अशा परिस्थितीत डॉलरचे स्थान ही अमेरिकेसमोरील फारशी मोठी समस्या असणार नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील कमी होत चाललेले महत्त्व ही अमेरिकेची खरी समस्या असल्याचे समर्स बजावत आहेत.

leave a reply