चिली लिथिअमच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण करणार

सँटियागो – जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लिथिअम निर्माता देश म्हणून ओळख असलेला चिली लवकरच आपल्याकडील लिथिअमच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण करणार आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हे पाऊल उचलल्याचे चिलीने जाहीर केले. या निर्णयाचा थेट फटका इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीवर होणार असल्याचा दावा केला जातो. तर मेक्सिकोनंतर चिलीने देखील लिथिअमच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण करण्याच्या दिशेने पाऊल उचलल्यामुळे अर्जेंटिनाला याचा सर्वाधिक फायदा होणार असल्याचेही बोलले जात आहे.

चिली लिथिअमच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण करणारलॅटिन अमेरिकेतील चिली या देशाचे राष्ट्राध्यक्ष ग्रॅब्रियल बोरिच यांनी लिथिअमबाबतचा आपला निर्णय जाहीर केला. ‘मजबूत आणि विकसित अर्थव्यवस्था उभारण्यासाठी हीच एक चांगली संधी असून ती वाया दवडता येणार नाही’, असे राष्ट्राध्यक्ष बोरिच यांनी घोषित केले. यापुढे लिथिअमच्या उत्खननाचे कंत्राट फक्त सरकारचे नियंत्रण असलेल्या पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपलाच देण्यात येईल, अशी घोषणा चिलीच्या राष्ट्राध्यक्षांनी केली.

याआधी करण्यात आलेले कंत्राट बाद केले जाणार नाहीत, पण या कंत्राटात सरकारला देखील सामील करून घेतले जाईल, अशी अपेक्षा राष्ट्राध्यक्ष बोरिच यांनी व्यक्त केली. चिली लिथिअमच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण करणारया निर्णयामुळे लिथिअमच्या उत्खननात सहभागी असलेल्या जगातील पहिल्या दोन स्थानांवर असलेल्या एल्बेमार्ले आणि एसक्यूएम या कंपन्यांना मोठा फटका बसू शकतो, असा दावा केला जातो. पण यामुळे जगभरात प्रसिद्ध असलेल्या लिथिअम ट्राएंगल एकमेकांपासून वेगळे होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

चिली लिथिअमच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण करणारत्याचबरोबर लिथिअमने समृद्ध देश स्वतंत्र धोरण स्वीकारीत आहेत, याकडे पाश्चिमात्य विश्लेषक लक्ष वेधत आहेत. गेल्या वर्षी लिथिअमचा सर्वाधिक साठा असलेल्या मेक्सिकोने आपल्या देशातील खाणींचे राष्ट्रीयीकरण केले होते. त्यानंतर आत्ता चिलीने देखील आपल्याकडील खाणींचे राष्ट्रीयीकरण केले आहे. त्यामुळे लिथिअमचा साठा असलेल्या अर्जेंटिनाकडील मागणी पुढील दोन वर्षात तिपटीने वाढेल, असा दावा माध्यमांमधून केला जात आहे. पण यामुळे इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी आवश्यक बॅटरीज्‌‍ची निर्मिती रोडवू शकते, अशी शक्यताही वर्तविली जात आहे.

leave a reply