सिरियामध्ये इराणसंलग्न दहशतवादी गटाच्या वाहनांवर हवाई हल्ला

हवाई हल्लाबगदाद – सिरियाच्या देर अल-झोर प्रांतातून प्रवास करणाऱ्या इराणसंलग्न सशस्त्र गटाच्या वाहनांवर मंगळवारी रात्री मोठा हवाई हल्ला झाला. यामध्ये इराणसंलग्न गटाचे 15 जण ठार झाल्याचा दावा सिरियन मानवाधिकार संघटना करीत आहेत. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने या हल्ल्यासाठी अमेरिकेला जबाबदार धरले आहे.

इराकच्या सीमेजवळ असलेल्या सिरियातील अल्बू कमाल भागात मंगळवारी रात्री जोरदार स्फोट झाले. किमान 22 इंधनवाहू टँकर आणि लष्करी वाहने प्रवास करीत असताना हवाई हल्ले झाले. यातील 10 टँकर उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर येत आहे. या भागावर इराणसंलग्न गटाचे नियंत्रण होते. त्यामुळे या हल्ल्यात इराणसंलग्न गटाचे दहशतवादी मारले गेल्याचा दावा केला जातो.

याआधी इराकजवळच्या अल्बू कमाल भागातील इराणसंलग्न गटांवर अमेरिकेने हवाई हल्ले चढविले होते. त्यामुळे मंगळवारी रात्री झालेल्या हवाई हल्ल्यांसाठी देखील अमेरिका जबाबदार असल्याची शक्यता वर्तविण्यात येते.

leave a reply