‘टायटल 42’ची मुदत संपत असतानाच अमेरिकेच्या सीमेवर लाखो निर्वासितांचे लोंढे दाखल

- घुसखोरांना रोखण्यासाठी फ्लोरिडा व टेक्सास प्रशासनाकडून हालचालींना वेग

वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्वासितांच्या लोंढ्यांना रोखण्यासाठी लागू केलेल्या ‘टायटल 42’ची मुदत गुरुवारी रात्री संपणार आहे. ही तरतूद लागू होणार नसल्याने मिळणाऱ्या संधीचा लाभ उठविण्यासाठी लाखो निर्वासितांचे लोंढे अमेरिका-मेक्सिको सीमेवर दाखल झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. पुढील काही दिवस अमेरिकेत दररोज 10 ते 15 हजार निर्वासित घुसखोरी करतील, असा इशाराही देण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मेक्सिको सीमेवर असलेल्या फ्लोरिडा तसेच टेक्सास प्रांतातील स्थानिक प्रशासनांनी वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

‘टायटल 42’ची मुदत संपत असतानाच अमेरिकेच्या सीमेवर लाखो निर्वासितांचे लोंढे दाखल - घुसखोरांना रोखण्यासाठी फ्लोरिडा व टेक्सास प्रशासनाकडून हालचालींना वेगज्यो बायडेन व डेमोक्रॅट पक्षाने अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर देशात घुसखोरी करणाऱ्या निर्वासितांना मोकळे रान देण्यात आले होते. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले अनेक कठोर निर्णय व उपाययोजना रद्द करण्यात आल्या होत्या. अमेरिकेत दाखल झालेल्या तसेच येणाऱ्या सुमारे एक कोटी निर्वासितांना कायदेशीर मान्यता देण्याची योजनाही बायडेन प्रशासनाने आखली होती. मात्र मेक्सिको सीमेवर असलेल्या फ्लोरिडा, टेक्सास व ॲरिझोना यासारख्या प्रांतांमधून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

बायडेन प्रशासनाने सीमेवरून येणाऱ्या निर्वासितांबाबत सौम्य धोरण स्वीकारल्याने घुसखोरीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. गेल्या दोन वर्षात अमेरिकेत विक्रमी पातळीवर घुसखोरी झाल्याचे अहवाल सीमा सुरक्षा तसेच निर्वासितांची जबाबदारी हाताळणाऱ्या विभागांनी दिले आहेत. रिपब्लिकन पक्षाने हा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडण्यास सुरुवात केली असून सीमेवरील परिस्थिती म्हणजे ‘बॉर्डर क्रायसिस’ असल्याचे आरोप केले आहेत. ‘टायटल 42’ची मुदत संपत असतानाच अमेरिकेच्या सीमेवर लाखो निर्वासितांचे लोंढे दाखल - घुसखोरांना रोखण्यासाठी फ्लोरिडा व टेक्सास प्रशासनाकडून हालचालींना वेगसीमाभागातील समस्येमुळे मानवी तस्करी, अमली पदार्थांचा व्यापार, गुन्हेगारी, हिंसाचार, शस्त्रांची वाहतूक तसेच लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

रिपब्लिकन पक्षाबरोबरच डेमोक्रॅट पक्षातील काही नेते व सदस्यांनीही या मुद्यावर आवाज उठविण्यास सुरुवात केल्याने बायडेन प्रशासनाला हालचाल करणे भाग पडले आहे. त्यामुळेच ‘टायटल 42’ची तरतूद बंद होत असतानाच स्वतंत्र विधेयक तसेच अतिरिक्त सुरक्षा तैनातीचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘टायटल 42’ची मुदत संपत असतानाच अमेरिकेच्या सीमेवर लाखो निर्वासितांचे लोंढे दाखल - घुसखोरांना रोखण्यासाठी फ्लोरिडा व टेक्सास प्रशासनाकडून हालचालींना वेगमात्र अखेरच्या क्षणी सुरू असलेल्या या हालचाली उपयुक्त ठरणार नाहीत, अशी टीका आजी माजी अधिकारी तसेच विश्लेषकांनी केली आहे.

दुसऱ्या बाजूला बायडेन प्रशासनाच्या अकार्यक्षमतेची जाणीव असलेल्या टेक्सास व फ्लोरिडा प्रांतातील स्थानिक प्रशासनांनी घुसखोरांना रोखण्यासाठी आक्रमक पावले उचलली आहेत. फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डेसँटिस यांनी बुधवारी निर्वासितांच्या घुसखोरीला आळा घालण्याऱ्या नव्या विधेयकावर स्वाक्षरी केली. त्यात घुसखोरी करणाऱ्या निर्वासितांना फ्लोरिडा प्रांतात आश्रय मिळणार नाही, अशा स्वरुपाच्या तरतुदींचा समावेश आहे. तर टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग ॲबॉट यांनी सीमाभागात सुरक्षा तैनाती मोठ्या प्रमाणात वाढविली आहे. त्याचवेळी घुसखोरांना प्रांतात प्रवेश करण्यासाठी जागा मिळू नये यासाठी तारांचे अतिरिक्त कुंपणही घालण्यात येत असून काही भागात कॅमेऱ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. टेक्सास प्रांतातील काही शहरांमध्ये आणीबाणीची घोषणा करण्यात आल्याचेही सांगण्यात येते.

हिंदी English

 

leave a reply