एनएसए अजित डोवल यांच्या निवासस्थानावरील सुरक्षा कडे भेदण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या दिल्लीमधील निवसस्थानावर एका व्यक्तीने सुरक्षा कडे तोडत घुसण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय औद्यागिक सुरक्षादलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी या व्यक्तीला वेळीच पकडले. पडकलेल्या व्यक्तीने आपल्याला एका चिपद्वारे नियंत्रित केले जात असल्याचा दावा चौकशीत केला. मात्र तपासात काहीही आढळले नाही. हा युवक मानसिक रुग्ण असावा, असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आल्याचे वृत्त आहे.

एनएसए अजित डोवल यांच्या निवासस्थानावरील सुरक्षा कडे भेदण्याचा प्रयत्नबुधवारी सकाळी ७.४५ सुमारात एनएसए डोवल यांच्या निवसस्थांनी आपले वाहन घेऊन घुसण्याचा प्रयत्न केला. झेड प्लस सुरक्षा असलेल्या डोवल यांच्या सुरक्षा कडे तोडण्याचा हा प्रयत्न झाल्यावर येथे एकच गोंधळ उडाला. एनएसए डोवल यांच्या निवासस्थानाचे सुरक्षा कडे भेदण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी डोवल हे घरातच होते. त्यामुळे गांभिर्य वाढले. मात्र सुरक्षेत तैनात सीआयएसएफच्या जवानांनी वेळीच या व्यक्तीला पकडले.

या व्यक्तींची चौकशी केल्यावर त्याने धक्कादायक दावा केला. आपल्या शरीरात एक चिप बसविण्यात आली असून आपल्याला रिमोटद्वारे नियंत्रित केले जात असल्याचे या व्यक्तीने सांगितले. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. या व्यक्तीची शारीरिक तपासणी करण्यात आली. मात्र तपासणीत त्याच्या शरीरात कोणतीही चिप आढळली नाही. हा व्यक्ती मानसिक रुग्ण असण्याचा प्राथमिक निष्कर्ष निघत आहे. या व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव शंतनू रेड्डी आहे. तो मुळचा बंगळुरूचा आहे. तर त्याने नोएडा येथून गाडी भाड्याने घेतली होती व तो एनएसए अजित डोवल यांच्या घरी आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र तो बंगळुरूवरुन कसा आला याचा खुलासा करण्यात आलेला नाही.

leave a reply