बांगलादेशकडून भारताला चितगाँग बंदराचा प्रस्ताव

ढाका – परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बांगलादेशचा दौरा करून या देशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्याशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान पंतप्रधान शेख हसिना यांनी भारताला चितगाँग बंदराचा प्रस्ताव दिला. या चितगाँग पोर्टचे व्यवस्थापन भारताच्या हाती आले तर भारताची आपल्या र्ईशान्येकडील राज्यांची कनेक्टिव्हिटी प्रचंड प्रमाणात वाढेल. म्हणूनच अत्यंत मोक्याचे बंदर अशी ओळख असलेल्या या चितगाँग पोर्टवर चीनची नजर रोखलेली होती. पण बांगलादेशच्या नेतृत्त्वानेच भारताला याचा प्रस्ताव दिल्याने चीनला धक्का बसला आहे.

चितगाँगपरराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी बांगलादशेच्या पंतप्रधानांना भारतभेटीचे आzमंत्रण दिले. तर दोन्ही देशांनी परस्परांमधील कनेक्टिव्हिटी अर्थात दळणवळण अधिकाधिक विकसित करण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असे पंतप्रधान हसिना यावेळी म्हणाल्या. याचा फार मोठा लाभ भारताच्या ईशान्येकडील राज्यांना मिळेल, असे पंतप्रधान हसिना यांनी म्हटले आहे. दरम्यान, चितगाँग बंदराबाबतचा प्रस्ताव देऊन पंतप्रधान हसिना यांनी भारतीयांना खूश करून टाकले आहे. हे बंदर आपल्या अख्यत्यारित यावे, यासाठी चीनने गेल्या काही वर्षांपासून जोरदार प्रयत्न सुरू केले होते. यासाठी बांगलादेशात चीनने प्रचंड प्रमाणात गुंतवणूक सुरू केली होती.

बांगलादेशचा वापर भारताच्या विरोधात तळासारखा करण्याचे चीनचे ध्येय होते. यात चीनला प्रारंभिक यश देखील मिळाले. पण कालांतराने चीनच्या कर्जाच्या सापळ्यात अडकलेल्या देशांच्या भयंकर कहाण्या जगासमोर आल्या होत्या. बांगलादेशच्या नेतृत्त्वाने वेळीच सावध होऊन चीनचे काही प्रकल्प रद्द करून टाकले होते. तर भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया या देशांच्या क्वाडमध्ये बांगलादेशही सहभागी होणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर, चीनला संताप अनावर झाला होता. याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा चीनने उघडपणे दिला होता. त्यामुळे चीनबरोबरील सहकार्याचे धोके अधिक ठळकपणे बांगलादेशसमोर आले होते. तर कोरोनाची साथ आलेली असताना, भारताने बांगलादेशला बहुमोल सहाय्य पुरविले होते.

या पार्श्वभूमीवर, बांगलादेशने भारताबरोबरील सहकार्य अधिक व्यापक करण्याचा धोरणात्मक निर्णयघेतला आहे. चितगाँग बंदराबाबत बांगलादेशच्या पंतप्रधानांनी दिलेला प्रस्ताव हेच दाखवून देत आहे.

leave a reply