बेंजामिन नेत्यान्याहू सहाव्यांदा इस्रायलचे पंतप्रधान बनले

इस्रायलचे पंतप्रधानजेरूसलेम – गुरुवारी दुपारी इस्रायलच्या संसदेत झालेल्या मतदानानंतर बेंजामिन नेत्यान्याहू यांना इस्रायलचे पंतप्रधान म्हणून घोषित करण्यात आले. 120 सदस्यांपैकी 73 सदस्यांनी नेत्यान्याहू यांच्या समर्थनार्थ मतदान केले. इस्रायलमधील प्रखर जहालमतवादी गटातील सदस्यांचा यात समावेश होता.

सहाव्यांदा पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या नेत्यान्याहू यांनी गाजावाजा न करता साध्यापद्धतीने आपल्या पदाची शपथ घेतली. पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर नेत्यान्याहू यांनी इराणचा अणुकार्यक्रम रोखणे आणि अधिक अरब देशांना अब्राहम करारात सामील करण्याला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. तर वेस्ट बँकमधील निर्वासितांच्या वस्त्यांबाबतही लवकरच निर्णय घेण्याचे संकेत नेत्यान्याहू यांनी दिले.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी तातडीने संदेश पाठवून नेत्यान्याहू यांचे अभिनंदन केले. तसेच रशिया व इस्रायलमधील सहकार्य वाढतील, असा दावा पुतिन यांनी केला. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी द्विराष्ट्रवादाचा मुद्दा नेत्यान्याहू सोडवतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नेत्यान्याहू यांचे अभिनंदन केले.

leave a reply