बायडेन प्रशासनाने गुळमुळीतपणा सोडून चीनला इशारा द्यावा

- अमेरिकन सिनेटरची मागणी

वॉशिंग्टन – ‘चीनने तैवानवर आक्रमण केल्यास अमेरिका ते खपवून घेणार नाही. तैवानच्या सुरक्षेसाठी अमेरिका धावून जाईल, असा सुस्पष्ट इशारा बायडेन प्रशासनाने चीनला द्यावा. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी तैवानबाबत कुठल्याही प्रकारची संदिग्धता ठेवू नये’, अशी मागणी अमेरिकन सिनेटच्या आर्म्ड् सर्व्हिसेस कमिटीचे सदस्य टॉम कॉटन यांनी केली.

Advertisement

तैवानबाबत अतिआक्रमक भूमिका घेणार्‍या चीनच्या विरोधात बायडेन प्रशासनाने उत्तर देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अमेरिकेने तैवानच्या सार्वभौमत्वाविषयी अधिक सुस्पष्ट भूमिका स्वीकारावी. चीन तैवानवर हल्ला चढवून त्याचा ताबा घेणार नाही, यासाठी अमेरिकेने सामरिक सुस्पष्टपणा स्वीकारावा. जर चीनने तैवानवर हल्ला चढवलाच तर अमेरिका तैवानच्या बचावासाठी येईल, असा इशारा बायडेन प्रशासनाने चीनला द्यावा, अशी अपेक्षा टॉम कॉटन यांनी रिगन इन्स्टिट्युटच्या एका कार्यक्रमात व्यक्त केली.

leave a reply