..तर जगात नवे संघर्ष भडकण्याचा धोका

- अमेरिकेचे ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर

लंडन – नव्या जागतिक व्यवस्थेबाबत अमेरिकेने चीनचीही भूमिका समजून घ्यायला हवी; असे झाले नाही तर जगात नवे संघर्ष भडकण्याचा धोका आहे, असा इशारा अमेरिकेचे ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांनी दिला. ब्रिटीश अभ्यासगट ‘कॅथम हाऊस’ने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात किसिंजर यांनी हे वक्तव्य केले.

‘जर अमेरिकेने चीनची बाजू समजून घेण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर युरोपात पहिल्या महायुद्धापूर्वी जशी स्थिती निर्माण झाली होती, तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. दीर्घकालिन संघर्ष भडकतील. त्यातील काही संघर्षांवर तोडगा निघेलही, पण एखादा संघर्ष नियंत्रणाबाहेर जाण्याचीही शक्यता आहे. असे झाले तर हा संघर्ष पहिल्या महायुद्धाच्या काळापेक्षा सध्याच्या काळात अधिक भयंकर परिणाम घडवू शकतो’, असे किसिंजर यांनी बजावले.

काही महिन्यांपूर्वीही किसिंजर यांनी, राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर बायडेन यांनी चीनबरोबर संवाद प्रस्थापित करण्यासाठी हालचाली सुरू कराव्यात, अन्यथा पहिल्या महायुद्धासारख्या भयंकर संघर्षाला तोंड फुटेल, असा इशारा दिला होता.

leave a reply