महासंचालकांच्या परिषदेत पोलीस टेक्नॉलॉजी मिशन स्थापन करण्याचा निर्णय

- माओवादी आणि दहशतवाद्यांविरोधातील कारवाईवर चर्चा

लखनौ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उत्तर प्रदेशमध्ये देशातील पोलीस महासंचालक व महानिरक्षकांची ५६वी परिषद पार पडली. या बैठकीत देेशाच्या अंतर्गतसुरक्षेबाबत असलेल्या विविध आव्हानांवर चर्चा झाली. अंतर्गत आव्हानांचा सामना करण्यासाठी एक व्यूहरचना आखण्यात येणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले. देशविरोधीशक्ती देशात अस्थितरता माजविण्याचा कट आखत आहेत. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांनी सतर्क रहावे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. या बैठकीत दहशतवादाबरोबर माओवाद्यांच्या व बंडखोरांच्या समस्येवर चर्चा झाली. तसेच सायबर गुन्हे, अमली पदार्थांची वाढलेली तस्करी, डार्क नेट या मुद्यांवरही विस्तीर्ण चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. यावेळी पंतप्रधानांनी एका उच्चस्तरीय पोलीस टेक्नॉलॉजची मिशन स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या टेक्नॉलॉजी मिशनमागे प्रत्यक्ष जमिनीवर काम करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांना भविष्यातील तंत्रज्ञान हाताळण्यास तयार करण्याचा उद्देश आहे.

महासंचालकांच्या परिषदेत पोलीस टेक्नॉलॉजी मिशन स्थापन करण्याचा निर्णय - माओवादी आणि दहशतवाद्यांविरोधातील कारवाईवर चर्चा५६ वी पोलीस महासंचालक व महानिरीक्षक परिषद रविवारी संपन्न झाली. या परिषदेला केंद्रीय तसेच राज्यांच्या पोलीस दलांचे ६२ महासंचालक आणि महानिरिक्षक उपस्थित होते. याशिवाय गुप्तचर विभागाचे ४०० हून अधिकारीही व्हर्च्युअली या परिषदेत सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंेद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवलही या बैठकीला उपस्थित होते.

दहशतवाद, माओवादी, सायबर गुन्हे, अंमली पदार्थांची तस्करी, स्वयंसेवी संस्थांना मिळणारा परदेशी निधी, ड्रोन संबंधित मुद्दे, सीमावर्ती गावांचा विकास इत्यादींसारख्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित महत्वाच्या विषयांच्या चर्चा यावेळी पार पडली. यावेळी पंतप्रधानांनी महत्वाच्या सूचना केल्या. यावेळी भविष्यातील आव्हानांसाठी तयार राहण्यास पंतप्रधानांनी सांगितले. अंतर्गत सुरक्षेत पोलिसांची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान हाताळण्यासही पोलिसांनी तयार व्हावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. यासाठी केंेद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस टेक्नॉलॉजी मिशन स्थापण्याची सूचना पंतप्रधानांनी केली.

leave a reply