अफगाणिस्तानातील घोडचुकांचे समर्थन करणार्‍या बायडेन यांच्याविरोधात अमेरिकेत असंतोष

अफगाणिस्तानातील घोडचुकांचे समर्थन करणार्‍या बायडेन यांच्याविरोधात अमेरिकेत असंतोषवॉशिंग्टन – अफगाणिस्तानात अल कायदाचे अस्तित्व उरलेले नाही, त्यामुळे या देशात अमेरिकेची सैन्यतैनाती आवश्यक नसल्याचे सांगून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सैन्यमाघारीचे समर्थन केले. तसेच अफगाणिस्तानात अडकलेल्या अमेरिकन्सच्या सुरक्षेची हमी देण्यासही बायडेन यांनी टाळाटाळ केली. यामुळे अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याविरोधात संताप व्यक्त होत आहे. यापुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका विश्‍वास ठेवता येणार नाही, असा संदेश राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी आपल्या भाषणातून दिल्याचे ताशेरे अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी ओढले आहेत. तर अमेरिकी नागरिकांची सुखरूप सुटका झाली नाही, तर बायडेन यांच्यावर महाभियोग चालविण्याखेरीज पर्याय नसल्याचा गंभीर इशारा अमेरिकेचे वरिष्ठ सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी दिला.

अफगाणिस्तानातील घोडचुकांचे समर्थन करणार्‍या बायडेन यांच्याविरोधात अमेरिकेत असंतोषतालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतलेल्याला आठवडा पूर्ण झाला आहे. राजधानी काबुलच्या प्रत्येक रस्त्यावर तालिबानचे दहशतवादी गस्त घालत असून विमानतळाच्या दिशेने जाणार्‍या प्रत्येक नागरिकाची झाडाझडती घेत आहेत. अमेरिकेचे १० हजारांहून अधिक नागरिक अजूनही अफगाणिस्तानात अडकून पडल्याची माहिती पेंटॅगॉनने दोन दिवसांपूर्वीच दिली होती. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेच्या नेतृत्वाकडून जगाला संदेश आणि तालिबानला इशारा देण्याची अपेक्षा सर्वसामान्य अमेरिकन नागरिक करीत होते.

अफगाणिस्तानातील घोडचुकांचे समर्थन करणार्‍या बायडेन यांच्याविरोधात अमेरिकेत असंतोषपण या गेल्या सात दिवसांमध्ये बायडेन फक्त चार दिवसच व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित होते, अशी बातमी समोर आल्यानंतर अमेरिकन जनतेमधील संताप शिगेला पोहोचला. त्यातच शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी नियोजित वेळेपक्षा उशीरा संबोधन सुरू केले आणि माध्यमांचे प्रश्‍न टाळून पळ काढल्यामुळे अमेरिकी जनतेतील रोष अधिकच वाढला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी शुक्रवारच्या भाषणात केलेले दोन दावे पेंटॅगॉनने खोडून काढल्यानंतर, बायडेन हे देशाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम नसल्याची टीका सोशल मीडियातून होत आहे.अफगाणिस्तानातील घोडचुकांचे समर्थन करणार्‍या बायडेन यांच्याविरोधात अमेरिकेत असंतोष

अमेरिकेवर ९/११चा दहशतवादी हल्ला घडविणार्‍या अल कायदाला संपविणे हे अमेरिकेचे उद्दिष्ट होते आणि ते गाठण्यात यश मिळाले आहे. यामुळे अफगाणिस्तानातून सैन्यमाघार घेणे उचित असल्याचे बायडेन म्हणाले. पण अजूनही अफगाणिस्तानात अल कायदाचे अस्तित्व असल्याचे पेंटॅगॉनने स्पष्ट केले. त्याचबरोबर, अफगाणिस्तानात अडकलेल्या अमेरिकी नागरिकांना बाहेर काढण्याबाबत तालिबानशी करार झाल्याचा दावा बायडेन यांनी आपल्या भाषणात केला. पण तालिबानचे दहशतवादी अमेरिकी नागरिकांना काबुल विमानतळात प्रवेश देत नसल्याचा आरोप सिनेटर मार्शा ब्लॅकबर्न यांनी केला.अफगाणिस्तानातील घोडचुकांचे समर्थन करणार्‍या बायडेन यांच्याविरोधात अमेरिकेत असंतोष

अफगाणिस्तानात अडकलेल्या अमेरिकी नागरिकांच्या सुरक्षित सुटकेच्या मुद्यावरुन अमेरिकन नेते व जनतेने राळ उठविला आहे. अमेरिकन नागरिक व अफगाणी शरणार्थींची सुरक्षित सुटका करण्यात हे प्रशासन अपयशी ठरले किंवा अमेरिकी नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला तर बायडेन यांच्यावर महाभियोग चालविला जाईल, त्यांना राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागेल, असा इशारा सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी केला.

leave a reply