डोनेत्स्कमधील संघर्षात ३००हून अधिक युक्रेनी जवान ठार

- रशियाच्या संरक्षण विभागाची माहिती

मॉस्को/किव्ह – डोनेत्स्क प्रांतात सुरू असलेल्या घनघोर संघर्षात रशियन फौजांनी युक्रेनच्या ३००हून अधिक जवानांना ठार केल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. त्याचवेळी युक्रेनकडून क्रिमिआतील सेव्हॅस्टोपोल शहरावर होणारा ड्रोनहल्ला रशियन यंत्रणांनी उधळल्याचा दावाही करण्यात आला आहे. तर युक्रेनच्या प्रतिहल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी रशियाकडे पुरेशी क्षमता असल्याची ग्वाही रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांनी दिली.

डोनेत्स्कमधील संघर्षात ३००हून अधिक युक्रेनी जवान ठार - रशियाच्या संरक्षण विभागाची माहितीरशियन फौजांनी गेल्या काही आठवड्यांमध्ये युक्रेनी लष्करावर करण्यात येणाऱ्या हल्ल्यांची तीव्रता अधिकाधिक वाढवत नेल्याचे समोर येत आहे. विशेषतः डोन्बास क्षेत्रातील विविध भागांमध्ये रशियन लष्कराकडून युक्रेनवर सातत्याने हल्ले सुरू आहेत. यात डोनेत्स्क शहरानजिक असलेल्या भागासहित क्रॅमाटोर्स्क, बाखमत, चॅसिव्ह यार यासारख्या शहरांमधील हल्ल्यांचा समावेश आहे. डोनेत्स्कमध्ये करण्यात आलेले हल्ले व युक्रेनी लष्कराचे झालेले नुकसानही याचाच भाग दिसतो.

रशियाच्या संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, डोनेत्स्क शहरानजिक २४ तासांमध्ये झालेल्या लढाईत युक्रेनचे ३३० जवान ठार झाले आहेत. डोनेत्स्कमधील संघर्षात ३००हून अधिक युक्रेनी जवान ठार - रशियाच्या संरक्षण विभागाची माहितीयावेळी एक रणागाडा, हॉवित्झर, सशस्त्र वाहने यासह मोठा शस्त्रसाठा उडवून देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. त्याचवेळी क्रिमिआच्या सेव्हॅस्टोपोल शहरावरील युक्रेनचा ड्रोनहल्लाही उधळण्यात आल्याचे रशियाच्या संरक्षण विभागाने स्पष्ट केले. यात युक्रेनचे एक ड्रोन नष्ट झाल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांनी एप्रिल महिन्यात झालेल्या संघर्षात युक्रेनने १५ हजारांहून अधिक जवान गमावल्याचा दावा केला आहे.

हिंदी

 

leave a reply