एक जूनपर्यंत अमेरिकी प्रशासनाकडील निधी संपलेला असेल

- अर्थमंत्री जॅनेट येलेन

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या संसदेने कर्जाची मर्यादा वाढविली नाही तर कदाचित एक जून रोजी प्रशासनाकडील निधी संपलेला असेल, असे अर्थमंत्री जॅनेट येलेन यांनी बजावले आहे. ‘कर्जाची मर्यादा वाढविण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत थांबल्यास त्याचा उद्योगक्षेत्रासह जनतेवर विपरित परिणाम होऊ शकतो, हे आपण यापूर्वी अनुभवलेले आहे. याने अमेरिकेच्या पतमानांकनावर नकारात्मक प्रभाव पडेल’, असे अर्थमंत्री येलेन यांनी संसदेला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

एक जूनपर्यंत अमेरिकी प्रशासनाकडील निधी संपलेला असेल - अर्थमंत्री जॅनेट येलेनअमेरिकी संसदेतील अभ्यासगट ‘काँग्रेशनल बजेट ऑफिस’नेही जून महिन्याच्या सुरुवातीलाच अमेरिकी कोषागार रिकामे होऊ शकते, याची जाणीव करून दिली आहे. येलेन यांचे पत्र प्रसिद्ध होत असतानाच राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी मंगळवारी ९ मे रोजी संसदेतील आघाडीच्या नेत्यांबरोबर चर्चा करण्याचे जाहीर केले आहे. अमेरिकेच्या संसदेने यापूर्वी डिसेंबर २०२१मध्ये ३१.४ ट्रिलियन डॉलर्सची कर्जमर्यादा निश्चित केली होती. १९ जानेवारी २०२३ रोजी संसदेने दिलेली ही कर्जमर्यादा ओलांडली गेली आहे.

हिंदी English

 

leave a reply