इराकच्या किरकूकमधील स्फोटात आठ जणांचा बळी

iraq kirkuk blast police vanबगदाद – रविवारी सकाळी इराकच्या किरकूक प्रांतात पोलीस वाहनावर झालेल्या बॉम्बहल्ल्यात आठ जवानांचा बळी गेला. इराकमध्ये प्रभाव वाढविण्याच्या तयारीत असलेल्या ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेने हा स्फोट घडविल्याचा संशय व्यक्त केला जातो. २०१७ साली आयएसला संपविण्यात यश मिळाल्याचा दावा इराक तसेच पाश्चिमात्य देशांनी केला होता.

किरकूक हा इंधनसंपन्न प्रांत म्हणून ओळखला जातो. या प्रांतावर ताबा घेण्यासाठी याआधीही प्रयत्न झाले होते. २०१५ साली इराकमध्ये हत्याकांड घडविणाऱ्या आयएसने या प्रांतासह येथील इंधनसाठ्यांवर नियंत्रण मिळविले होते. त्यानंतर अमेरिकेने कुर्द गटांच्या सहाय्याने किरकूक प्रांत आयएसच्या तावडीतून सोडविले होते. २०१७ साली इराकच्या लष्कराने कुर्दांकडून या प्रांताचा ताबा घेतला. अशा परिस्थितीत, किरकूकमधील हा स्फोट इराकच्या सरकारसाठी आव्हान ठरतो.

हिंदी

leave a reply