जम्मू आणि काश्मीरमध्ये लश्करच्या चार दहशतवाद्यांना अटक

जम्मू काश्मीर  दि, 3 (वृत्तसंस्था ) जम्मू आणि काश्मीरच्या हंडवारा व सोपेर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी ‘लश्कर-ए-तोयबा’च्या चार दहशतवाद्यांना आणि पाच हस्तकांना अटक केली. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या अटकेमुळेळे दहशतवाद्यांचा कट उधळला गेला आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या हंडवारा व सोपेरमध्ये दहशतवादी दडून बसल्याची खबर सुरक्षा दलाला मिळाली. त्यानंतर सुरक्षा दलाने त्यांच्यावर कारवाई केली. हंडवारामधून सुरक्षा दलाने लश्करच्या चार दहशतवाद्यांना अटक केली. परवेझ अहमद चोपन, मुदासिर अहमद पंडीत, मोहम्मद रफी शेख, बुर्हान वाणी अशी या चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून तीन ‘एके- ४७ रायफल्स’, आठ ‘एके- ४७ मँगि्झन’, १२ हँन्ड ग्रेनेडस्, तीन पिस्तूले जप्त करण्यात आले. तर हंडवाराच्या शालपोरा गावात सुरक्षादलाने केलेल्या कारवाईत लश्करच्या तीन हस्तकांना अटक केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पिस्तूले आणि हँन्ड ग्रेनेडस् जप्त केले. तसेच बारामुल्लामधल्या सुरक्षा दलाच्या कारवाईत लश्करच्या आणखी  दोन हस्तकांना अटक करण्यात आली. एकाच दिवशी जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने ही मोहीम राबवून दहशतवाद्यांचा डाव उधळून लावला आहे.

leave a reply