फ्रान्स हा अमेरिकेचा अंकित देश नाही

- राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची स्पष्ट ग्वाही

ॲमस्टरडॅम – ‘फ्रान्स हा अमेरिकेचा सहकारी आहे, अंकित नाही. सहकारी असणे म्हणजे स्वतंत्र विचार करण्याचा हक्क नसलेल्या अंकित किंवा नोकरासारखे वर्तन ठेवणे, असा होत नाही’, या शब्दात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याची ग्वाही दिली. काही दिवसांपूर्वीच युरोपिय देशांनी तैवानप्रकरणी अमेरिका किंवा चीनची बाजू घेऊ नये, असा सल्ला फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला होता. त्यांच्या वक्तव्यावर अमेरिकेतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मात्र त्यानंतरही मॅक्रॉन यांनी त्याचा पुनरुच्चार करीत आपण आपली भूमिका बदलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

फ्रान्स हा अमेरिकेचा अंकित देश नाही - राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची स्पष्ट ग्वाहीगेल्याच आठवड्यात फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनचा दौरा केला. त्यानंतर फ्रेंच दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी युरोपिय देशांनी तैवानबाबत निष्पक्ष रहावे, अशी भूमिका मांडली. ‘तैवानच्या संकटात सहभागी होणे, हे खरच आपल्या भल्याचे आहे का? असा प्रश्न युरोपिय देशांनी स्वत:ला विचारण्याची गरज आहे. अजिबात नाही. याप्रकरणी अमेरिकेच्या अजेंड्याचे अनुकरण केले तर ते युरोपिय देशांसाठी अतिशय वाईट ठरेल आणि चीनकडून यावर टोकाची प्रतिक्रिया उमटू शकेल’, असे मॅक्रॉन यांनी म्हटले होते.

मॅक्रॉन यांच्या वक्तव्यावरून अमेरिकेत तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. अमेरिकी संसद सदस्यांनी युरोपिय देशांनी रशिया-युक्रेन युद्ध सुरू असल्याची जाणीव ठेवावी, असे बजावले होते. अमेरिकेने या युद्धात युक्रेन व युरोपला सहाय्य करण्याचे सोडले तर चालेल का, असा प्रश्न अमेरिकी सिनेटर्सनी विचारला होता. फ्रान्स हा अमेरिकेचा अंकित देश नाही - राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची स्पष्ट ग्वाहीअमेरिका तसेच युरोपिय माध्यमे व विश्लेषकांनीही मॅक्रॉन यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. पण त्यानंतरही फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी आपले वक्तव्य अथवा भूमिकेत बदल करण्यास नकार दिला.

नेदरलॅण्डसला दिलेल्या भेटीत फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. युरोप अमेरिकेचा सहकारी असल्याची आठवण त्यांनी यावेळी करुन दिली. त्याचवेळी चीन-तैवान मुद्यावर परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवणे ही फ्रान्सची स्पष्ट भूमिका आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मॅक्रॉन यांच्या भूमिकेला फ्रेंच अर्थमंत्री ब्रुनो ली मेर यांच्यासह युरोपियन कौन्सिलचे प्रमुख असलेल्या चार्ल्स मिशेल यांनीही पाठिंबा दिला.

फ्रान्स हा अमेरिकेचा अंकित देश नाही - राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची स्पष्ट ग्वाहीयुरोपचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्त्व यासंदर्भात राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी केलेले वक्तव्य योग्यच आहे, असे फ्रान्सचे अर्थमंत्री ले मेर यांनी सांगितले. तर युरोपियन कौन्सिलचे प्रमुख चार्ल्स मिशेल यांनी, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतलेल्या भूमिकेला युरोपिय देशांचे समर्थन असून फक्त या देशाच्या नेत्यांनी तसेच उघडपणे बोलायचे टाळले आहे, असा दावा केला.

अमेरिका व युरोपिय महासंघातील आघाडी मजबूत आहे. पण त्याचा अर्थ आम्ही प्रत्येक बाबतीत अमेरिकेचे आंधळेपणाने अनुकरण करु, असा होत नाही या शब्दात मिशेल यांनी फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. धोरणात्मक स्वायत्ततेच्या मुद्यावर युरोपने पूर्वीच्या तुलनेत चांगली प्रगती केली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

leave a reply