पुढील पाच वर्षे जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर तीन टक्क्यांच्या आसपास राहिल

- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांचा इशारा

वॉशिंग्टन – वाढते व्याजदर, अमेरिका व युरोपातील बँकिंग क्षेत्रावर ओढवलेले संकट व भूराजकीय स्तरावरील वाढत्या मतभेदांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्याला धक्का बसला आहे. याचे परिणाम अर्थव्यवस्थेच्या विकासावर होत असून पुढील पाच वर्षे जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर तीन टक्क्यांच्या आसपासच राहिल, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्तालिना जॉर्जिवा यांनी दिला. गेल्याच महिन्यात ‘वर्ल्ड बँके’ने आर्थिक मंदीचे सावट व बँकिंग क्षेत्रातील संकटाच्या पार्श्वभूमीवर जागतिक अर्थव्यवस्थेवर ‘लॉस्ट डिकेड’चे संकट ओढवू शकते, असे बजावले होते.

पुढील पाच वर्षे जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर तीन टक्क्यांच्या आसपास राहिल - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांचा इशाराअमेरिकेत झालेल्या एका कार्यक्रमात नाणेनिधीच्या प्रमुखांनी जागतिक अर्थव्यवस्थेसंदर्भातील आपली भूमिका मांडली. ‘आर्थिक विकासाचे चक्र मंदावत असून हा कालावधी अधिक लांबण्याची भीती आहे. यावर्षी आर्थिक विकासदर तीन टक्क्यांपेक्षा कमी राहिल. त्यानंतर पुढील पाच वर्षे विकासदर तीन टक्क्यांच्या जवळपासच असेल. १९९० सालानंतरचा हा सर्वात कमी विकासदर ठरतो. गेली दोन दशके जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर सरासरी ३.८ टक्के राहिला आहे’, अशा शब्दात जॉर्जिवा यांनी संभाव्य आर्थिक संकटाकडे लक्ष वेधले.

या घटणाऱ्या विकासदराचा सर्वाधिक फटका कमी उत्पन्न असलेल्या देशांना बसणार आहे. कोरोनाच्या साथीनंतर जगभरात गरीबी व उपासमारी वेगाने वाढते आहे. विकासदरातील घसरणीमुळे हा कल कायम राहिल, अशी भीती नाणेनिधीच्या प्रमुखांनी व्यक्त केली. पुढील पाच वर्षे जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर तीन टक्क्यांच्या आसपास राहिल - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांचा इशारा‘आर्थिक विकासदर पुन्हा पूर्वपदावर येण्याचा मार्ग अतिशय खडबडीत व अस्पष्ट आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील देशांना परस्परांशी जोडणारे बंध पूर्वीच्या तुलनेत कमकुवत झाले आहेत’, याची जाणीव जॉर्जिवा यांनी यावेळी करुन दिली.

गेल्याच महिन्यात वर्ल्ड बँकेने ‘फॉलिंग लाँग टर्म ग्रोथ प्रॉस्पेक्टस्‌‍’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात, जागतिक अर्थव्यवस्थेची वेगमर्यादा घसरण्याचे भाकित वर्तविण्यात आले होतेे. ‘या शतकाच्या पहिल्या दशकात जागतिक अर्थव्यवस्थेचा सरासरी विकासदर सहा टक्के होता. पुढील पाच वर्षे जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर तीन टक्क्यांच्या आसपास राहिल - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांचा इशारामात्र २०२२ ते २०३० या कालावधीतील सरासरी विकासदर याच्या एक तृतियांश इतकाच राहिल. या कालावधीत जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास सरासरी २.२ टक्के या गतीने होईल. असे दिसते’, या शब्दात वर्ल्ड बँकेने ‘लॉस्ट डिकेड’च्या संकटाबाबत चिंता व्यक्त केली होती.

जगातील आघाडीचे अर्थतज्ज्ञ तसेच विश्लेषकही वारंवार जागकित मंदीचे भाकित वर्तवित असून यावेळी येणारी मंदी दीर्घकालिन परिणाम करणारी असेल, असे दावे करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘वर्ल्ड बँक’ व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या दोन आघाडीच्या संस्थांनी दीर्घकालिन घसरणीबाबत केलेली वक्तव्ये लक्ष वेधून घेणारी ठरत आहेत.

leave a reply