एप्रिलमधील जीएसटी महसूल १.८७ लाख कोटींवर

- भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठी बातमी असल्याची पंतप्रधानांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली – ‘वस्तू व सेवा कर-जीएसटी’तून मिळणारा मासिक महसूल आतापर्यंतच्या उचांकी पातळीवर पोहोचला आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात १.८७ लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. मार्च महिन्यापेक्षा हे संकलन १२ टक्क्यांनी जास्त आहे. वाढलेला जीएसटी महसूल भारतीय अर्थव्यवस्थेसाठी खूशखबर मानली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही मोठी बातमी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

एप्रिलमधील जीएसटी महसूल १.८७ लाख कोटींवर - भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठी बातमी असल्याची पंतप्रधानांची प्रतिक्रियाएप्रिल महिन्यात जीएसटी महसूलात मोठी वाढ होत एका महिन्यातील महसूल १.८७ लाख कोटींवर गेला आहे. पहिल्यांदाच एका महिन्यातील जीएसटी महसूली संकलन पावणे दोन लाख कोटींच्या पुढे गेले आहे. याआधी गेल्या महिन्यात १.६८ लाख कोटी इतका जीएसटी सरकारला मिळाला होता. गेल्या काही महिन्यांपासून दर महिन्यांचे जीएसटी संकलन १.४ लाख कोटी रुपयांच्या पुढेच राहिले आहे. तर गेल्या तीन महिन्यांपासून हे संकलन दीड लाख कोटींपेक्षा जास्त होत आहे.

आयएजीएसीमध्ये मोठी वाढ झाली आहे. १.८७ लाख कोटी रुपयांच्या जीएसटीपैकी ८९ लाख १५९ कोटी रुपये हे आयजीएसटीतून मिळाले आहेत. या आयजीएसटीमध्येही आयात मालावर आकारलेला कर ४३ लाख ९७२ कोटी रुपयांचा आहे. तसेच केंद्रीय जीएसची ३८ लाख कोटी रुपये, राज्यांना मिळणारा एसजीएसटी ४७ लाख कोटी रुपये इतका आहे. तसेच उपकराच्या रुपात १२.२५ लाख कोटी रुपये सरकारला मिळाले आहेत.

वाढलेला जीएसटी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी शुभ संकेत मानला जात आहे. मागणी प्रचंड प्रमाणात वाढली असून अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊन तीने वेग पकडल्याचे यातून दिसत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. जीएसटी महसूल जमा करण्याच्या प्रक्रियेत आणण्यात आलेली सुलभताही जीएसटी महसूलात वाढीसाठी महत्त्वाची ठरत आहे, असेही तज्ज्ञ लक्षात आणून देत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी कर कमी असताना महसूल जास्त गोळा होत असल्याचे लक्ष वेधले असून जीएसटी कर प्रणालीच्या यशस्वीतेचा हा दाखला असल्याचे म्हटले आहे.

हिंदी English

 

leave a reply