रशियाच्या पर्म विद्यापीठातील माथेफिरूच्या गोळीबारात सहा विद्यार्थ्यांचा बळी

- सर्व भारतीय विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती

पर्ममॉस्को – रशियाच्या उरल शहरातील पर्म विद्यापीठात एका माथेफिरूने केलेल्या गोळीबारात सहा विद्यार्थ्यांचा बळी गेला. तर २८ जण जखमी झाले. या विद्यापीठात शिक्षण घेत असलेले भारतीय विद्यार्थी सुरक्षित असल्याचे रशियातील भारताच्या दूतावासाने स्पष्ट केले. या हल्ल्यामागचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण या घटनेमुळे रशियामध्ये माथेफिरूंच्या हल्ल्यांमध्ये वाढ दिसत आहे.

पर्मरशियन राजधानी मॉस्कोपासून सातशे मैल अंतरावर असलेल्या उरल शहरात सोमवारी सकाळी ही घटना घडली. पर्म या ख्यातनाम विद्यापीठात परदेशी विद्यार्थी देखील शिक्षण घेत आहेत. सोमवारी सकाळी ११च्या सुमारास वर्ग सुरू असताना विद्यापीठाच्या एका इमारतीत गोळ्यांचा आवाज झाला. तिमूर पेकमन्सरो असे हल्लेखोराचे नाव असून तो देखील याच विद्यापीठातील विद्यार्थी असल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे.

तिमूरने केलेल्या गोळीबारात सहा जणांचा बळी गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिल्यानंतर प्राचार्य व कर्मचार्‍यांनी सर्व विद्यार्थ्यांसह वर्गांचे दरवाजे आतून बंद केले. हल्लेखोरापासून स्वत:चा जीव वाचविण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी इमारतीच्या खिडक्यांमधून उड्या घेतल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. या विद्यापीठात भारतीय वंशाचे विद्यार्थी देखील असून ते सर्व सुरक्षित असल्याचे भारतीय पर्मदूतावासाने जाहीर केले. तसेच पर्म विद्यापीठातील घटनेवर चिंता व्यक्त केली.

या हल्ल्यामागे कुठल्याही प्रकारचा राजकीय किंवा धार्मिक हेतू नसल्याचे रशियन सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केले. पण सहविद्यार्थ्यांबाबतच्या तिरस्कारातून ही घटना घडल्याचा दावा केला जातो.

रशियामध्ये बंदूक बाळगण्याबाबत अतिशय कठोर नियम असल्याचा दावा केला जातो. तरी देखील याप्रकरणी विद्यार्थ्याकडे बंदूक आढळल्यामुळे रशियन यंत्रणा व माध्यमे चिंता व्यक्त करीत आहेत. त्याचबरोबर गेल्या चार महिन्यात रशियात घडलेली ही दुसरी घटना ठरते.

leave a reply