आठ वर्षात देशाची व्यापारी निर्यात ट्रिलियन डॉलर्सवर जाऊ शकते

- ‘सीआयआय’चा अहवाल

नवी दिल्ली – ३१ मार्च २०२२ रोजी संपणार्‍या या वित्तीय वर्षात देश ४०० अब्ज डॉलर्सच्या व्यापारी निर्यातीचा टप्पा पार करील, असा विश्‍वास केंद्रीय व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी व्यक्त केला होता. पण भारत पुढच्या आठ वर्षात एक हजार अब्ज डॉलर्स अर्थात एक ट्रिलियन डॉलर्सच्या निर्यातीचे लक्ष्य गाठू शकतो, असा विश्‍वास ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री-सीआयआय’चे अध्यक्ष टी. व्ही. नरेंद्रन यांनी व्यक्त केला. मात्र यासाठी व्यापक धोरण राबवून आक्रमक मोहीम हाती घेण्याची गरज आहे, असे सीआयआयच्या अध्यक्षांनी बजावले.

आठ वर्षात देशाची व्यापारी निर्यात ट्रिलियन डॉलर्सवर जाऊ शकते - ‘सीआयआय’चा अहवाल‘सीआयआय’ने रविवारी ‘अचिव्हिंग वन ट्रिलियन डॉलर्स इन मर्चंडाईझ् एक्सपोर्टस्: अ रोडमॅप’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला. यात देशाची निर्यात वाढविण्यासाठी उत्पादने आणि बाजारपेठा यांची विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे. याबरोबरच एक ट्रिलियन डॉलर्सच्या निर्यातीचे लक्ष्य गाठण्यासाठी धोरणात्मक पातळीवरील निर्णय व त्याची अंमलबजावणी, याकडेही सदर अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. जागतिक उत्पादनाच्या साखळीत मुल्यवर्धन करण्याची क्षमता प्राप्त करून भारताने या प्रक्रियेशी स्वतःला जोडून घ्यायला हवे. याबरोबरच महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करणे, ही काळाची गरज बनलेली आहे, असे या अहवालात सुचविण्यात आले आहे.

भारताच्या निर्यातीसाठी उत्तम बाजारपेठ ठरणार्‍या ४१ देशांची यादीच सीआयआयच्या या अहवालात देण्यात आलेली आहे. याबरोबर भारताच्या निर्यात प्रचंड प्रमाणात वाढविण्यासाठी १४ उत्पादनांवर लक्ष केंद्रीत करायला हवे, असे सीआयआयचा हा अहवाल सांगतो. या १४ उत्पादनांमध्ये वाहने, इलेक्ट्रिकल मनिशनरी आणि उपकरणे, केमिकल उत्पादने, फार्मास्युटिकल, प्लास्टिक आणि टेक्साईल तसेच मिशन्स यासारख्या उत्पादनांचा समावेश आहे. याबरोबरच भारताने निर्यातीला चालना देण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय दर्जाची मार्केटिंग एजन्सी नेमावी, असा सल्ला सीआयआयने दिला.

सध्या भारत सुमारे २० देशांबरोबर मुक्त व्यापारी करारावर चर्चा करीत आहे. याला वेग देऊन ही प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज आहे. तसे झाले तर भारताची निर्यात अधिक सुलभ होईल. या मुक्त व्यापारी करारांशी गुंतवणूक कराराही जोडून घेतला आला, तर ती अधिक श्रेयस्कर बाब ठरेल.

leave a reply