जगातील आघाडीच्या मध्यवर्ती बँकांकडून सोन्याच्या खरेदीत वाढ

‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’चा अहवाल

लंडन – जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थैर्य वाढत असल्याचे इशारे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व ‘वर्ल्ड बँके’सारख्या आघाडीच्या संस्थांकडून देण्यात आले आहेत. या इशाऱ्यांबरोबर अर्थव्यवस्थेतील मंदीसदृश वातावरणाची दखल घेत जगातील आघाडीच्या मध्यवर्ती बँकांनी त्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जगातील आघाडीच्या मध्यवर्ती बँकांनी मंदी व अस्थैर्याच्या काळातील सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखण्यात येणाऱ्या सोन्याच्या खरेदीकडे मोहरा वळविला आहे. २०२३ सालच्या पहिल्या दोन महिन्यात फक्त मध्यवर्ती बँकांनी तब्बल १२५ टन सोन्याची खरेदी केल्याची माहिती ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’च्या अहवालात देण्यात आली.
COMM-central-bank-demandसिंगापूर, तुर्की, चीन, रशिया व भारत या जगातील आघाडीच्या देशांच्या मध्यवर्ती बँकांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली आहे. सिंगापूरने अवघ्या दोन महिन्यात ५१ टनांहून अधिक सोने खरेदी करून लक्ष वेधून घेतले आहे. तुर्कीने ४५.५ टन तर चीनने जवळपास ४० टन सोने खरेदी केल्याचे उघड झाले. रशियाने ३० टनांहून अधिक तर भारताने सुमारे तीन टन सोन्याची खरेदी  केल्याचे सांगण्यात येते. उझबेकिस्तान व मेक्सिको या देशांनीही सोन्याची खरेदी केल्याचे ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने म्हटले आहे.
नव्या वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यातच मध्यवर्ती बँकांकडून तब्बल सव्वाशे टन सोन्याची खरेदी होणे ही अत्यंत महत्त्वाची व लक्षणीय घटना असल्याचा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे. २०१० सालापासून जगातील आघाडीच्या मध्यवर्ती बँकांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी सुरू केली होती. २०२३च्या पहिल्या दोन महिन्यात झालेली खरेदी हा गेल्या १४ वर्षातील उच्चांक ठरला आहे. वर्षाच्या सुरुवातीला दिसून आलेला हा कल पुढेही कायम राहिले, असे भाकित वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने वर्तविले आहे.
२०२२ साली जगातील मध्यवर्ती बँकांनी एकूण १,१३६ टन सोने खरेदी केले होते. हा देखील नवा उच्चांक असल्याची माहिती कौन्सिलने अहवालात दिली. तुर्कीसारखा देश गेले १५ महिने सातत्याने सोन्याची खरेदी करत असल्याकडे अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.  २०२२ साली सर्वाधिक सोने खरेदी करणाऱ्या बँकांमध्ये तुर्कीची मध्यवर्ती बँक आघाडीवर असल्याचे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलकडून नमूद करण्यात आले.
चीनमधील सोन्याचे राखीव साठे २,०६८ टनांवर पोहोचले
gold purchaseबीजिंग – चीनच्या मध्यवर्ती बँकेकडून सलग पाच महिने सोन्याची खरेदी सुरू असल्याचे वृत्त समोर आले आहे. या पाच महिन्यांमध्ये चीनच्या मध्यवर्ती बँकेने १०० टनांहून अधिक सोने खरेदी केले असून चीनमधील सोन्याचे राखीव साठे २,०६८ टनांवर पोहोचले आहेत. २०२३ साल सुरू झाल्यापासून पहिल्या तीन महिन्यातच चीनने जवळपास ५८ टन सोन्याची खरेदी केली आहे. फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक म्हणजे २५ टन सोने खरेदी करण्यात आल्याचे ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’च्या अहवालावरून उघड झाले आहे. चीनकडून ‘ब्रिक्स’ गटासाठी सोन्याचे पाठबळ असलेले चलन सादर करण्यात येणार असून त्यासाठी खरेदीत वाढ केली जात असल्याचा दावा, काही विश्लेषकांनी केला

leave a reply