भारतीय संशोधकांनी ‘कोरोनाव्हायरस’ च्या जीनोम साखळीचा शोध लावला

अहमदाबाद – जगात आतापर्यंत सव्वा लाख जणांचे प्राण घेणाऱ्या कोरोनाव्हायरच्या महाभयंकर साथीवर लस शोधण्यास साहाय्यक होईल, असे महत्वाचे संशोधन भारतीय संशोधकांनी केले आहे. ‘गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर’च्या (जीबीआरसी) वैज्ञानिकांनी कोरोनाव्हायरसचे जीनोम साखळी शोधून काढली आहे. सारे जग कोरोनाव्हायरस त्रासलेले असताना आणि यावर लस शोधण्यासाठी धडपडत असताना या विषाणूच्या जीनोम साखळीचा शोध अतिशय महत्वाचे ठरतो.

जगभरातील संशोधकाना कोरोनाव्हायरसच्या विषाणू वर अद्याप स्पष्ट माहिती मिळविता आलेली नाही. अशा वेळी ‘जीबीआरसी’च्या सांशोधकांनी या विषाणूची जीनोम साखळीचा शोध लागला आहे. जीबीआरसीच्या संशोधकांनी याचा खुलासा केला. जीनोम म्हणजे जनुकीय संरचना, त्याचे कार्य, आराखडा. थोडक्यात या विषाणूची जनुकीय कुंडली संशोधकांना सापडली आहे. कोरोनाव्हायरस विषाणूच्या बाबतीत एवढी महत्वपूर्ण माहिती मिळवणारी जीबीआरसी देशामधली पहिली सरकारी प्रयोगशाळा आहे.

‘जीबीआरसीने आपल्या संशोधनात जीनोम साखळीमुळे कोरोनाची उत्पत्ती कशी झाली, त्यावर कुठले औषध किंवा लस बनवता येईल आणि हा विषाणू कितपत त्रासदायक ठरु शकतो, हे शोधण्यास मदत मिळणार आहे. हे केवळ देशासाठी नाही साऱ्या जगासाठी उपकारक ठरणार आहे. या संशोधनाबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी ‘गुजरात बायोटेक्नोलॉजी रिसर्च सेंटर’च्या संशोधकांचे कौतुक केले आहे.

leave a reply