जकार्ता – नैसर्गिक खनिजसंपत्तीने समृद्ध असलेल्या ‘नॉर्थ नटूना सी’च्या क्षेत्रातील चिनी जहाजांवर पाळत ठेवण्यासाठी इंडोनेशियाने विनाशिका, गस्तीनौका आणि ड्रोनची तैनाती वाढविली आहे. इंडोनेशियाच्या विशेष आर्थिक क्षेत्रात येणाऱ्या या सागरी क्षेत्रावरही चीनने आपला अधिकार सांगितला आहे.
इंडोनेशियाचे नॉर्थ नटूना सी हेच चीन आपले साऊथ चायना सीचे क्षेत्र असल्याचा दावा करीत आहे. नैसर्गिक इंधनवायूने संपन्न असलेल्या या क्षेत्रातील ‘टून ब्लॉक’ या सागरी क्षेत्रात चीनच्या तटरक्षकदलाचे जहाज 30 डिसेंबरपासून गस्त घालत आहे. चिनी तटरक्षकदलाच्या या घुसखोरीवर नजर ठेवण्यासाठीच इंडोनेशियाने विनाशिका, गस्तीनौका आणि ड्रोन तैनात केल्याची माहिती इंडोनेशियन नौदलप्रमुख लक्ष्मणा माद्या मुहम्मद अली यांनी दिली.