पहिली स्वदेशी ड्रोन डिफेन्स सिस्टिम ‘इंद्रजाल’ विकसित

नवी दिल्ली – नुकताच जम्मूच्या वायुसेनेच्या तळावर ड्रोनद्वारे दोन दहशतवादी हल्ले करण्यात आले होते. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारे ड्रोनद्वारे हल्ले झाले आहेत. यामुळे सुरक्षा यंत्रणेसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहे. या पार्श्‍वभूमीवर एक लक्षवेधी बातमी समोर आली आहे. रोबोटिक्स क्षेत्रात काम करणार्‍या ग्रेन रोबोटिक्स या खाजगी कंपनीने पहिली स्वदेशी ड्रोन डिफेन्स डोम सिस्टिम विकसित करण्यात यश मिळविले आहे. या कंपनीच्या सल्लागार मंडळावर असलेल्या संरक्षण तज्ज्ञ, आजी-माजी लष्करी याच्या मार्गदर्शनाखील ‘इंद्रजाल’ नावाच्या या ड्रोन डिफेन्स डोम सिस्टिमची निर्मिती करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.

पहिली स्वदेशी ड्रोन डिफेन्स सिस्टिम ‘इंद्रजाल’ विकसितदहशतवाद्यांनी घातपातासाठी सुरू केलेला ड्रोनचा वापर सुरक्षा यंत्रणेसमोरील नवे आव्हान म्हणून समोर आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना शस्त्र पुरविठ्यासाठी ड्रोनचा वापर केला जात होता. असे तस्करीचे कित्येक प्रयत्न सुरक्षादलांनी उधळून लावले. मात्र आता या ड्रोनचा वापर करून हल्ले घडविण्याचा प्रयत्न पाकिस्तानी दहशतवादी संघटना करीत आहेत. रविवारी झालेल्या हल्ल्यानंतर या आघाडीवर भारताला तोंड देण्याची तयार ठेवावी लागेल, असे स्पष्टपणे सामरिक विश्‍लेषक बजावत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर स्वदेशी बनावटीच्या पहिल्या ड्रोन डिफेन्स डोम सिस्टिमचे वृत्त समोर आले आहे. ड्रोन डिफेन्स डोम सिस्टिमला इंद्रजित असे नाव देण्यात आले असून ग्रेन रोबोटिक्स या कंपनीने ही यंत्रणा विकसित केली आहे. एका ड्रोन डिफेन्स सिस्टिमद्वारे 1000 ते 2000 चौरस किलोमीटर क्षेत्रात हवाई सुरक्षा पुरविली जाऊ शकते, असे कंपनीचे म्हणणे आहे. ही यंत्रणा एकावेळी अनेक हल्ल्यांना रोखण्यास सक्षम आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी आणि रोबोटिक्सवर आधारलेली ही यंत्रणा हवाई धोके ओळखू शकते.

मानवविरहीत विमाने अर्थात युएव्ही, शत्रूकडून सोडण्यात आलेली अस्त्रे अशा सर्व धोक्यांना नष्ट करण्याची क्षमता या यंत्रणेमध्ये आहे. रियल टाईम डाटावर ही यंत्रणा काम करते. तसेच शत्रूच्या शस्त्रांचा माग काढून त्यांना नष्ट करू शकते. यासाठी एक नेटवर्क तयार करते. ही यंत्रणा म्हणजे 9 ते 10 तंत्रज्ञानाचे एकिकरण असून 24 तास 365 दिवस अगदी खराब हवामानातही ही यंत्रणा काम करू शकते, असे कंपनीचे म्हणणे आहे. सध्या ग्रेन रोबोटिक्स भारतीय संरक्षणदलांबरोबर विविध प्रोजेक्टशी जोडली गेलेली आहे.

leave a reply