इराणने अरब बंडखोर नेत्याला फाशी दिली

तेहरान – इराणमधील राजवटीचा विरोधक आणि अरब बंडखोर संघटनेचा नेता ‘हबिब फराजोल्ला शाब’ याला फाशी दिली. २०१८ साली इराणमधील लष्करी संचलनात घडविलेल्या बॉम्बस्फोटाचा हबिब शाब हा सूत्रधार असल्याचा आरोप इराणने केला होता. या गुन्ह्यासाठी त्याला फाशीची शिक्षा दिल्याचे इराणने जाहीर केले.

इराणने अरब बंडखोर नेत्याला फाशी दिलीपाच वर्षांपूर्वी राजधानी तेहरानमध्ये आयोजित लष्करी संचलनावेळी झालेल्या बॉम्बस्फोटात २५ जणांचा बळी गेला होता. यामध्ये रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या जवानांचा समावेश होता. अमेरिका व इस्रायलने हा हल्ला चढविल्याचा आरोप इराणने सुरुवातीला केला होता. इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादच्या एजंट्सनी हा स्फोट घडविल्याच्या बातम्या इराणी माध्यमांनी दिल्या होत्या. पण काही दिवसानंतर ‘हरकत अल-निदाल’ या अरब दहशतवादी संघटनेने हा स्फोट घडविल्याचे इराणने जाहीर केले होते.

संघटनेचा नेता हबिब फराजोल्ला शाब या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे सांगून इराणने तुर्कीतून त्याला ताब्यात घेतले होते. इराण तसेच स्वीडीश नागरिकत्व असलेला हबिब शाब गेली काही महिने इराणच्या तुरुंगात होता. इराणने अरब बंडखोर नेत्याला फाशी दिलीडिसेंबर महिन्यात शाबची सुनावणी सुरू झाली. त्याला बचावासाठी वकिलही पुरविला नसल्याची तक्रार त्याचे समर्थक तसेच मानवाधिकार संघटना करीत होत्या. त्याला फाशीची शिक्षा देऊन इराणने नव्या संघर्षाला आमंत्रण दिल्याचा दावा ब्रिटनमधील इराणी वृत्तसंस्थेने केला आहे.

‘हरकत अल-निदाल’ ही संघटना गेली काही वर्षे खुझेस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करीत आहे. इराणच्या नैॠत्येकडील खुझेस्तान हा इंधनसमृद्ध प्रांत असून येथे अरबी भाषिकांची मोठी लोकसंख्या आहे. इराणची राजवट आपल्या प्रांतातील इंधनाची लूट करीत असल्याचा आरोप सदर संघटना व विरोधक करीत आहेत. हबिब शाबच्या फाशीनंतर खुझेस्तानमधील इराणविरोधी आंदोलनाला बळ मिळेल, असा दावा केला जातो.

हिंदी

 

leave a reply