इराणने अझरबैजानच्या चार अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली

तेहरान – इराण आणि अझरबैजानमधील तणाव वाढत चालला आहे. शुक्रवारी इराणने अझरबैजानच्या चार राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. गेल्या महिन्यात अझरबैजानने इराणच्या राजनैतिक अधिकाऱ्यांवर अशीच कारवाई केली होती. त्याचे प्रत्युत्तर म्हणून अझरबैजानी अधिकाऱ्यांवर ही कारवाई केल्याचे इराणने म्हटले आहे.

इराणने अझरबैजानच्या चार अधिकाऱ्यांची हकालपट्टी केलीइराण व अझरबैजान परस्परांवर कटकारस्थानांचे आरोप करीत आहे. इराण कट्टरपंथियांना हाताशी घेऊन अझरबैजानमधील सरकार उलथण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप गेल्या महिन्यात अझेरी सरकारने केला होता. यानंतर अझरबैजानने इराणच्या दूतावासातील चार अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली होती. त्यानंतर इराणची राजधानी तेहरानमधील अझरबैजानच्या दूतावासातील सुरक्षा प्रमुख व दोन जवानांची संशयास्पदरित्या हत्या करण्यात आली होती. यामुळे दोन्ही शेजारी देशांमधील संबंधात तणाव निर्माण झाला होता. शुक्रवारी इराणने अझरबैजानच्या चार राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केल्यानंतर हा तणाव अधिकच चिघळल्याचा दावा केला जातो.

दरम्यान, अझरबैजान आणि इस्रायलमधील सहकार्य इराणच्या संतापाचे कारण असल्याचा दावा केला जातो. मार्च महिन्यात अझरबैजानने इस्रायलमध्ये आपले दूतावास सुरू केले होते. त्याचबरोबर अझरबैजान इस्रायलकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची खरेदी करीत आहे. हे सहकार्य आपल्याविरोधी असल्याचा आरोप इराणने केला होता.

हिंदी

 

leave a reply