इराणचा अणुकार्यक्रम नियंत्रित करता येणे अवघड बनले आहे

- अणुऊर्जा आयोगाच्या प्रमुखांची चिंता

व्हिएन्ना/वॉशिंग्टन – ‘जगातील अण्वस्त्रसज्ज देशांकडे असू शकतो इतका 60 टक्के संवर्धित युरेनियमचा साठा इराणकडे आहे आणि ते अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी पुरेसे ठरेल. इराणच्या या अणुबॉम्बनिर्मितीचे भूत बॉटलमधून बाहेर पडले आहे, आता त्याला नियंत्रित करणे शक्य नाही’, असा इशारा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे प्रमुख राफेल ग्रॉसी यांनी दिला. तरीही इराणच्या अणुकार्यक्रमाची कठोर पडताळणी आवश्यक आहे, असेही ग्रॉसी यांनी स्पष्ट केले. इराणबरोबर अणुकरार करून निर्बंधातून सवलत देण्यासाठी उत्सूक असलेल्या अमेरिकेच्या बायडेन प्रशासनासाठी हा इशारा ठरतो.

इराणचा अणुकार्यक्रम नियंत्रित करता येणे अवघड बनले आहे - अणुऊर्जा आयोगाच्या प्रमुखांची चिंताआंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे प्रमुख ग्रॉसी यांनी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत इराणच्या अणुकार्यक्रमावर तीव्र चिंता व्यक्त केली. ‘इराणच्या अणुप्रकल्पात संवर्धित युरेनियमचा साठा 60 टक्क्यांपर्यंत आहे. अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी ते पुरेसे ठरेल. व्यावसायिक वापरासाठी जेमतेम दोन ते तीन टक्के संवर्धित युरेनियम आवश्यक असते. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात संवर्धित युरेनियमचा साठा करणार्‍या इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत सजग राहणे आवश्यक आहे’, असे ग्रॉसी म्हणाले.

अणुकार्यक्रम राबविण्याचा इराणला पूर्ण अधिकार आहे, पण या अणुकार्यक्रमाचे परिणाम दुर्लक्षित करता येणार नाहीत, असे ग्रॉसी यांनी स्पष्ट केले. ‘व्हिएन्ना येथील यशस्वी वाटाघाटीनंतर अमेरिका आणि इराणमधील अणुकरार पुनरूज्जीवित झाला, तरी इराणचा अणुकार्यक्रम मागे ढकलला जाऊ शकत नाही. कारण इराणचा अणुकार्यक्रम फार पुढे गेलेला आहे’, असा गंभीर इशारा ग्रॉसी यांनी या मुलाखतीत दिला.इराणचा अणुकार्यक्रम नियंत्रित करता येणे अवघड बनले आहे - अणुऊर्जा आयोगाच्या प्रमुखांची चिंता

2015 साली झालेल्या अणुकरारानुसार, इराणला 3.67 टक्के संवर्धित युरेनियमचा साठा करण्याची परवानगी मिळाली होती. पण वर्षभरापूर्वी अणुकरारातून माघार घेतलेल्या इराणने युरेनियमचे संवर्धन 60 टक्क्यांपर्यंत नेले. आपला अणुकार्यक्रम शांतीपूर्ण असल्याचा दावा इराण करीत आहे. पण इस्रायल, सौदी अरेबिया व इतर आखाती देश इराण अण्वस्त्रनिर्मितीच्या तयारीत असल्याचा आरोप करीत आहेत.

इराणचा अणुकार्यक्रम नियंत्रित करता येणे अवघड बनले आहे - अणुऊर्जा आयोगाच्या प्रमुखांची चिंतामंगळवारपासून अमेरिका आणि इराण यांच्यातील अणुकरारावरील वाटाघाटी नव्याने सुरू झाल्या. अमेरिकेचे बायडेन प्रशासन इराणवरील निर्बंध काढण्यासाठी तयार झाल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र अधिकृत पातळीवर याबाबत बोलताना, इराण अजूनही अणुकरारात सामील व्हायला तयार नाही, अशी तक्रार अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन करीत आहेत.

दरम्यान, ‘अमेरिकेच्या साथीने किंवा अमेरिकेच्या सहकार्याखेरीज, इस्रायल इराणला अण्वस्त्रसज्ज होण्यापासून रोखल्यावाचून राहणार नाही. कारण अण्वस्त्रसज्ज इराण हा इस्रायलच्या अस्तित्त्वासाठी धोकादायक ठरेल’, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दोन दिवसांपूर्वीच दिला होता. यावेळी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्रीही उपस्थित होते. त्यामुळे हमासबरोबरील संघर्ष थांबल्यानंतर इस्रायल पुन्हा इराणकडे लक्ष वळविणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply