इराक इंधनाच्या मोबदल्यात फ्रान्सकडून रफायल घेणार

- माध्यमांचा दावा

rafaleबगदाद – आपले हवाईदल प्रगत लढाऊ विमानांनी सज्ज करण्यासाठी इराक फ्रान्सकडून 14 रफायल विमाने खरेदी करणार आहे. 24 कोटी डॉलर्सचा हा करार असून इराक इंधनाच्या मोबदल्यात फ्रान्सकडून ही विमाने खरेदी करू शकतो, असा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत.

इराकची अर्थव्यवस्था बेजार बनली असून एका डॉलरमागे 1,454 इराकी दिनार मोजावे लागत आहेत. इराकच्या अर्थव्यवस्थेसमोर मोठी आव्हाने असताना, लष्करी आघाडीवर तुर्कीकडून इराकच्या सुरक्षेला आव्हान मिळतआहे. तुर्कीच्या लष्कराने इराकच्या उत्तरेकडीलभागात तळ ठोकला आहे.

iraq-flag-oilअशा परिस्थितीत इराकला आपले हवाईदल शस्त्रसज्ज करण्याची आवश्यकता भासू लागली आहे. यासाठी इराक आपल्या हवाईदलातील एफ-16 या जुन्या अमेरिकी विमानांना सेवेतून निवृत्त करून त्याजागी फ्रान्सची रफायल विमाने खरेदी करण्याच्या विचारात आहे. इराक किमान 14 फ्रेंच विमानांची खरेदी करू शकतो, असा दावा अमेरिकी मासिकाने याआधी केला होता.

पण फ्रेंच विमानांची खरेदी करताना देशाच्या तिजोरीवर अतिरिक्त भार येऊ शकतो. हे ओळखून इराक फ्रान्सला इंधनाच्या मोबदल्यात लढाऊ विमानांची खरेदी करण्याचा प्रस्ताव देऊ शकतो. इंधनाची टंचाई जाणवत असलेल्या फ्रान्ससाठी हा आकर्षक प्रस्ताव ठरू शकतो.

leave a reply