इस्रायलच्या कारवायांमुळे इराणच्या सुरक्षा यंत्रणेत अविश्वास वाढला

- अमेरिकी वृत्तपत्राचा दावा

इराणच्या सुरक्षा यंत्रणेतवॉशिंग्टन/तेहरान – गेल्या काही आठवड्यांमध्ये इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचे महत्त्वाचे अधिकारी व जवान यांची संशयास्पदरित्या हत्या करण्यात आली. इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने हे घडवून आणल्याचा आरोप इराणी माध्यमे करीत आहेत. याआधीही इराणने इस्रायलवर असे आरोप केले होते. पण यावेळी इराणने आपल्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांची हकालपट्टी केली. तसेच रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरुन अटक केली. यामुळे इराणच्या सुरक्षा यंत्रणेत कमालीचा गोंधळ माजून अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणच्या राजकीय व लष्करी यंत्रणेत असा बेबनाव निर्माण करणे, हीच इस्रायलची योजना होती, असा दावा अमेरिकेच्या वृत्तपत्राने केला आहे.

इराणच्या सुरक्षा यंत्रणेतमे महिन्याच्या अखेरीस इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचे वरिष्ठ अधिकारी कर्नल हसन सय्यद खोदायी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर कर्नल अली इस्माईलझादेह, अली कमानी अशा रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. यामध्ये कुद्स फोर्सेसच्या अधिकाऱ्यांबरोबरच रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या ड्रोन विभागाच्या जवानांचा देखील समावेश होता. तर गेल्या आठवड्यात तुर्कीमध्ये इस्रायली नागरिकांच्या हत्येचा कट उधळून रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या एजंट्सना अटक केल्याची माहिती समोर आली.

गेल्या दीड महिन्यातील या घडामोडींचे थेट परिणाम इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सवर झाले. तुर्कीतील कट उधळल्यानंतर पुढच्या काही तासात इराणने रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख हुसेन तईब यांना पदावरुन दूर केले. तईब हे गेली 12 वर्षे गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख होते. अलिकडच्या काळात तईब यांच्यावर इराणमधील इस्रायली गुप्तचर यंत्रणेचा पर्दाफाश करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

इराणच्या सुरक्षा यंत्रणेततईब यांच्या हकालपट्टीला काही तास उलटत नाही तोच, रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचे वरिष्ठ अधिकारी ब्रिगेडिअर जनरल अली नसिरी यांना अतिशय गोपनीयपणे अटक करण्यात आली. नसिरी यांच्यावर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप ठेवला आहे. तर गेल्या दीड महिन्यामध्ये इराणी यंत्रणांनी हेरगिरीच्या आरोपावरुन संरक्षण मंत्रालयातील 20 हून अधिक कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते.

त्यामुळे इस्रायली गुप्तचर यंत्रणेने इराणच्या सुरक्षा यंत्रणेत मोठ्या प्रमाणात घुसखोरी केल्याची चर्चा रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍समध्येच सुरू झाली आहे. तसेच इराणच्या सुरक्षा यंत्रणेत परस्परांविषयी अविश्वास वाढल्याचा दावा इराणचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अली अब्ताही यांनी अमेरिकी वृत्तपत्राशी बोलताना केला.

दरम्यान, इराणच्या राजकारणात सर्वोच्च धार्मिक नेते आयातुलल्ला खामेनी यांच्याकडे सर्वाधिकार आहेत. त्यापाठोपाठ रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सकडे इराणच्या राष्ट्राध्यक्षांपेक्षाही जास्त अधिकारअसल्याचा दावा केला जातो. अशा परिस्थितीत, रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचे अपयश उघड करून इराणच्या राजकीय व सुरक्षा यंत्रणेत अविश्वास वाढविण्याची इस्रायलची योजना होती, असा दावा इस्रायली अधिकाऱ्यांनी या वृत्तपत्राशी बोलताना केला.

leave a reply