आफ्रिकन महासंघाच्या बैठकीतून इस्रायलच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी

इस्रायलने इराण, दक्षिण आफ्रिका आणि अल्जेरियाला जबाबदार धरले

african-union meetअदिस अबाबा – इथिओपिया येथे आयोजित केलेल्या आफ्रिकन महासंघाच्या बैठकीतून इस्रायलच्या राजनैतिक अधिकारी शॅरॉन बार-ली यांची हकालपट्टी करण्यात आली. इस्रायलने पॅलेस्टिनींविरोधात केलेल्या कारवाईचा निषेध म्हणून ही कारवाई केल्याचे आफ्रिकन महासंघाने म्हटले आहे. पण इस्रायलच्या महिला राजनैतिक अधिकाऱ्यांवरील या कारवाईसाठी इराण जबाबदार असून दक्षिण आफ्रिका आणि अल्जेरियाने इराणला पाठिंबा दिल्याचा आरोप इस्रायलने केला आहे.

african-union-israel२०२१ साली आफ्रिकन महासंघाने इस्रायलला निरिक्षक देशाचा दर्जा दिला होता. हा निर्णय घेऊन आफ्रिकन महासंघाने इस्रायलला देश म्हणून मान्यता दिल्याची टीका महासंघातील आफ्रिकन अरब देशांनी केली होती. आंतरराष्ट्रीय स्तरातूनही आफ्रिकन महसंघाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर गेल्याच वर्षी आफ्रिकन महासंघाने निरिक्षक देश म्हणून इस्रायलचे नाव वजा केले होते. तसेच १६ जानेवारी ते १९ फेब्रुवारीपर्यंत पार पडलेल्या महासंघाच्या बैठकीसाठी इस्रायलच्या राजनैतिक अधिकारी शॅरॉन बार-ली यांना आमंत्रितही केले नव्हते.

तरी देखील इस्रायलच्या राजनैतिक अधिकारी सदर बैठकीला उपस्थित राहिल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केल्याचे बार-ली यांनी सांगितले. गेल्या दीड महिन्यात इस्रायलने वेस्ट बँक भागात केलेल्या कारवाईत किमान ५० पॅलेस्टिनींचा बळी गेल्याचा दावा केला जातो. या कारणास्तव इस्रायलला या बैठकीपासून दूर ठेवल्याचे आफ्रिकन महासंघाचे म्हणणे आहे. पण इस्रायलने आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांवरील कारवाईसाठी आफ्रिकन महासंघच नाही तर इराण देखील जबाबदार असल्याचा आरोप इस्रायलने केला. अल्जेरिया व दक्षिण आफ्रिकेने इराणच्या या निर्णयाचे समर्थन केले, असे इस्रायलने म्हटले आहे.

ही कारवाई करुन इस्रायलविरोधात व पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आफ्रिकन महासंघ असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याचबरोबर या संघटनेवरील इराणचा प्रभाव देखील अधोरेखित होत असल्याचे माध्यमांचे म्हणणे आहे.

leave a reply