जयशंकर यांची ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, मालदीव आणि भूतानच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा

नवी दिल्ली – अमेरिका आणि रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबरील चर्चेनंतर भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, मालदीव व भूतान या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशीही फोनवरून चर्चा केली. याचे तपशील जाहीर करण्यात आलेले नाहीत. मात्र या देशांबरोबर द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने व्यापक चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे या सर्व देशांचे सध्या चीनबरोबर वाद आहेत. या पार्श्‍वभूमीवर जयशंकर यांची या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी झालेली चर्चा महत्त्वाची ठरते.

जयशंकर यांची ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, मालदीव आणि भूतानच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चापरराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी बुधवारी सकाळी इंडोनेशियाचे परराष्ट्रमंत्री रेटनो लेस्तरी मर्सुदी यांच्याशी चर्चा केली. जी-20 चे अध्यक्षपद सध्या इंडोनेशियाकडे आहे. तर भारत हा सध्या जी-20 च्या ट्रॉयकाचा भाग आहे. जी-20 च्या सदस्य देशांचे सध्याचे अध्यक्षपद असलेला देश आणि त्याआधीच्या वर्षी अध्यक्षपद भूषविलेल्या देशासंह पुढील अध्यक्षपद ज्या देशाकडे येणार आहे, अशा तीन देशांना ट्रायका देश म्हटले जाते. हे देश एकमेकांच्या सहकार्याने काम करतात. पुढील वर्षी भारताकडे जी-20 गटाचे अध्यक्षपद येईल. त्यामुळे जी-20 चे सध्याचे अध्यक्षपद भूषवित असलेल्या इंडोनेशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबरील चर्चा अतिशय महत्त्वाची ठरते.

यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देताना क्षेत्रिय व अंतरराष्ट्रीय मुद्यांबरोबर द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा केली. म्यानमार, अफगाणिस्तानच्या मुद्यांवरही यावेळी परराष्ट्रमंत्री जयशंकर आणि इंडोनेशियाचे परराष्ट्रमंत्री मर्सुदी यांच्यामध्ये चर्चा झाली. तसेच ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री मॅरिस पेन यांच्याशीही जयशंकर यांनी फोनवरून चर्चा केली. ऑस्ट्रेलिया हा भारताचा क्वाडमधील सहकारी आहे. इंडो-पॅसिफीक क्षेत्रात चीनच्या वर्चस्ववादाचे आव्हान वाढले आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देताना क्षेत्रिय व अंतरराष्ट्रीय मुद्यांबरोबर द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा केली. म्यानमार, अफगाणिस्तानच्या मुद्यांवरही यावेळी परराष्ट्रमंत्री जयशंकर आणि इंडोनेशियाचे परराष्ट्रमंत्री मर्सुदी यांच्यामध्ये चर्चा झाली.

तसेच ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री मॅरिस पेन यांच्याशीही जयशंकर यांनी फोनवरून चर्चा केली. ऑस्ट्रेलिया हा भारताचा क्वाडमधील सहकारी देश आहे. इंडो-पॅसिफीक क्षेत्रात चीनचे आव्हान वाढले आहे. तैवानच्या मुद्यावरूनही या क्षेत्रात वातावरण तापले आहेत. तर चीन आणि ऑस्ट्रेलियामधील व्यापारी वाद अजूनही चिघळलेल्या स्थितीत आहे. तसेच काही महिन्यांपूर्वीच चीनपासून असलेल्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर ऑस्ट्रेलिया अमेरिका आणि ब्रिटनबरोबर ऑकस गटात सहभागी झाला आहे. गेल्यावर्षी चीनने लडाखमध्ये केलेल्या घुसखोरीनंतर भारत आणि चीनमधील संबंधही सध्या ताणले गेले असून या पार्श्‍वभूमीवर भारत आणि ऑस्ट्रेलिया अधिक जवळ आले आहे. या पार्श्‍वभूमीवर ऑस्ट्रेलियांच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबरील या चर्चेचे महत्त्व वाढते. 2022 सालात दोन्ही देशांचे सहकार्य नव्या उंचीवर पोहोचेल, असे जयशंकर यांनी म्हटले आहे.

तर मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहीद यांच्याशीही द्विपक्षीय सहकार्यावर व समान हितसंबंधांवर चर्चा झाल्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी म्हटले आहे. मालदीव वर चीनच्या कर्जाचा मोठा डोंगर आहे. या व्याजाची रक्कम मालदीवच्या जीडीपीच्या 50 टक्के आहे. अशा स्थितीतून बाहेर पडण्यासाठी भारत मालदीवला सहाय्य करीत आहे. याशिवाय भूतानचे परराष्ट्रमंत्री तान्दी डोरजी यांच्याशीही परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी संवाद साधला. कोरोनाच्या संकटात सर्व सहकार्य करण्याचे आश्‍वासन यावेळी जयशंकर यांनी डोरजी यांना दिले. तसेच दोन्ही देशांमधील भागिदारी अधिक विकसित करण्याचा निर्णय या चर्चेत झाला.

leave a reply