‘साऊथ चायना सी’मध्ये मलेशिया, जपानचा सराव

जपानचा सरावटोकिओ – ‘साऊंड कॅनन्स’ अर्थात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या यंत्रणेचा वापर करून शत्रू देशाची जहाजे हुसकावून लावण्याचा सराव मलेशिया आणि जपानच्या तटरक्षकदलात पार पडला. सदर सराव ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात पार पडला. हा सराव चीनच्या ‘फ्लोटिला’ला इशारा देणारा असल्याचे उघड आहे. ‘साऊथ चायना सी’च्या सागरी क्षेत्राच्या वादात मलेशिया व जपान यांचा थेट सहभाग नाही. पण या सागरी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय व्यापार व वाहतूकीच्या सुरक्षेवर या दोन्ही देशांचे हितसंबंध अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत, दोन्ही देशांच्या तटरक्षकदलाने साऊथ चायना सीच्या क्षेत्रात आयोजित केलेला हा सराव महत्त्वाचा ठरतो. त्यातही मलेशियन तटरक्षकदलाने या सरावाच्या निमित्ताने पहिल्यांदाच ‘ॲकॉस्टिक’ यंत्रणेचा वापर केला.

हिंदी

leave a reply