अरूणाचल प्रदेशमध्ये भूस्खलनात सात जणांचा बळी

ईटानगर – मुसळधार पावसामुळे अरूणाचल प्रदेशच्या पापुम पारे जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनांमध्ये सातजणांचा बळी गेला असून एक जण बेपत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. तर अरूणाचल प्रदेश सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

Arunachal-Landslideअरूणाचल प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे १३ जणांचा बळी घेतला आहे. शुक्रवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास अरूणाचल प्रदेशच्या पापुम पारे भागात भूस्खलनाची घटना घडली. यात एकाच कुटूंबातील चार जण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. यात एका आठ महिन्याच्या मुलीचा समावेश आहे. घटनेची माहिती कळताच पोलिस, एनडीआरएफ आणि स्थानिकांच्या मदतीने मृतदेहांना बाहेर काढण्यात आले. दुसरी घटना मोदारिजो भागात घडली. या ठिकाणी सकाळी साडेअकराच्या सुमारास झालेल्या भूस्खलनात एकाच कुटुंबातील तीन जणांचा बळी गेला तर एकजण बेपत्ता आहे.

या दुर्घटनेनंतर तातडीने मदत कार्य हाती घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी या घटनांवर दुख व्यक्त केले आहे आणि प्रत्येक मृत कुटुंबीयांच्या सदस्यांना चार-चार लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. तसेच भूस्खलनाचा धोका असलेल्या क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे.

leave a reply