कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे लॅटिन अमेरिकेतील देशही धोक्यात 

कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे लॅटिन अमेरिकेतील देशही धोक्यात 

साओ पावलो – कोरोनाव्हायरसने लॅटिन अमेरिकेत १२३ जणांचा बळी घेतला असून, या देशांमध्ये सात हजारांहून अधिक जणांना लागण झाली आहे. मात्र ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी, ही साथ म्हणजे छोटा सामाजिक आजार असल्याचे सांगून, त्याकडे फारसे गांभीर्याने पाहण्याची गरज नसल्याची अजब प्रतिक्रिया दिली आहे. लॅटिन अमेरिकेतल्या ब्राझीलमध्ये कोरोनाव्हायरसचे सर्वाधिक रूग्ण सापडले आहेत.

ब्राझीलमध्ये या साथीने ५९ जण दगावले आहेत. २२४७ जणांना कोरोनाव्हायरस साथीची लागण झाली आहे. तर इक्वेडोरमध्येदेखील कोरोनाव्हायरसच्या साथीने 28 जण दगावले आहेत आणि या साथीच्या रुग्णांची संख्या हजारांवर पोहोचली आहे. या खंडातील अर्जेंटिना, कोलंबिया, पेरू, चिली, पनामा, मेक्सिकोमध्ये कोरोनाव्हायरसच्या रूग्णांची संख्या वाढत चालली  आहे.

या पार्श्वभूमीवर इक्वेडोर, कोलंबिया, बोल्व्हिया, अर्जेंटिना, पेरू या देशांनी लॉकडाऊन घोषित केला आहे आणि या साथीच्या विरोधात युध्दपातळीवर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मात्र सर्वाधिक मृत्यू झालेल्या व रुग्ण सापडलेल्या ब्राझीलमध्ये अद्याप लॉकडाऊन  जाहीर केला गेलेला नाही.

यासाठी ब्राझीलचे विरोधी पक्ष व सामाजिक संस्थानी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांच्यावर सडकून टीका केली आहे. या टीकेनंतरही राष्ट्राध्यक्षांनी लॉकडाऊनची गरज नसल्याचा निर्वाळा दिला आहे

leave a reply