राज्यात वीज दरात कपातीचा मोठा निर्णय

मुंबई – लोकडाऊनमुळे उद्योगधंद्यांसह सामान्य नागरिकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विद्द्युत नियामक आयोगातर्फे (एमईआरसी) घरगुती, व्यावसायिक आणि उद्योगांच्या वीजदरात पुढील पाच वर्षासाठी कपातिची शिफारस केली आहे. घरगुती विजेच्या दारात सरासरी ७ ते ८ टक्के व उद्योगासाठीचे वीज दर तब्बल 10 ते 12 टक्क्यांनी कपात करण्यात यावी असे एमईआरसीने सुचवले आहे. यानुसार वीज वितरक कंपन्यांना वीज दर कमी करावे लागतील. नवे दार १ एप्रिल पासून लागू होतील, अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी दिली.

सध्याच्या परिस्थितीत आर्थिक विकासाला चालना देण्याचा उद्देशाने वीज दारात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे उद्योगांना प्रोत्साहन मिळेल असे कुलकर्णी यांनी याबाबतची घोषणा करतांना सांगितले. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी उद्योगासाठीचे वीज दर तब्बल 10 ते 12 टक्क्यांनी कमी करण्यात येणार आहेत.

घरगुती विजेकरिताचे दर 5 ते 7 टक्क्यांनी कमी होणार असून शेतीसाठीचे वीज दर 1 टक्क्यांनी कमी होतील मुंबईत बेस्टचे उद्योगासाठीचे वीज दर 7 ते 8 टक्क्यांनी, तर व्यवसायासाठीचे वीज दर 8 ते 9 टक्क्यांनी आणि घरगुती विजेचे दर 1 ते 2 टक्क्यांनी कमी होतील.

मुंबईत अनेक भागात टाटा आणि अदानी या कंपन्यातर्फे वीज वितरण करण्यात येते. त्यांच्यासाठीही देखील आयोगाने वीज दर कपात सुचविली आहे. या कंपन्यांचे उद्योगासाठी असलेले विजेचे दर 18 ते 20 टक्क्यांनी तर व्यवसायासाठी विजेचे दर 19 ते 20 टक्क्यांनीआणि घ रगुती वापराचे विजेचे दर तब्बल 10 ते 11 टक्क्यांनी कमी होणार आहेत.

या दर कपातीमुळे उद्योग- व्यवसाय यांना मोठा दिलासा मिळेल, अशी आशा कुलकर्णी यांनी व्यक्त केली. वीज दर कपातीच्या निर्णयाअंतर्गत पुढील पाच वर्षासाठी दार कपात लागू राहिल असे स्पष्ट करण्यात आले.

leave a reply