जागतिक व्यवस्थेत मोठ्या उलथापालथी होत आहेत

इराणचे सर्वोच्च नेते खामेनी

तेहरान – ‘जागतिक व्यवस्थेत मोठ्या उलथापालथी सुरू आहेत. या नव्या व्यवस्थेत इराणचा शत्रूदेश असलेल्या अमेरिकेची शक्ती कमी होत चालली आहे. इराणने या संधीचा लाभ घेऊन परराष्ट्र धोरणातील आपली गतीशीलता वाढवून पुढाकार घ्यावा व हालचाली तीव्र कराव्या’, असे इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर या नव्या जागतिक व्यवस्थेत इराणविरोधी आघाडी नसेल, असा विश्वास खामेनी यांनी व्यक्त केला.

Khamenei‘अमेरिका हा जगातील इराणचा महत्त्वाचा शत्रूदेश आहे. पण सध्याच्या अमेरिकेकडे आधीप्रमाणे मजबूत नेतृत्व उरलेले नाही. गेल्या दोन दशकात अमेरिकेला सर्वात दुबळे प्रशासन मिळाले आहे. बराक ओबामा यांचे प्रशासन जॉर्ज बुश यांच्यापेक्षाही कमकुवत होते. तर डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन ओबामा यांच्यापेक्षा दुबळे आणि बायडेन यांचे प्रशासन तर ट्रम्प यांच्यापेक्षाही दुबळे आहे’, असा दावा खामेनी यांनी केला. तरी देखील अमेरिकेपासून असलेला धोका टळलेला नाही, असा दावा खामेनी यांनी केला.

‘इराणच्या विरोधात अरब देशांची आघाडी उभारण्याची घोषणा अमेरिकेने केली होती. पण आज जे काही घडत आहे, ते अगदी उलट आहे. अरब देश इराणबरोबर संबंध सुधारत आहेत. तसेच बायडेन प्रशासन स्वत:च्या योजनेनुसार इराणबरोबर अणुकरार करण्यासाठी आणि निर्बंध लादण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पण यातही त्यांना अपयश मिळत आहे’, अशी खिल्ली खामेनी यांनी उडविली.

leave a reply