लष्करप्रमुखांच्या लडाख भेटीद्वारे चीनला संदेश

लडाख – नवे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी लडाखमधील चीनलगतच्या सीमाभागाला भेट देऊन इथल्या सुरक्षेचा आढावा घेतला. काही दिवसांपूर्वीच लष्करप्रमुखांनी चीनला सीमावाद सोडविण्यात स्वारस्य नसल्याचे सांगून सीमावाद धगधगत ठेवण्याचे धोरण चीनने स्वीकारल्याचा आरोप केला होता. त्या पार्श्वभूमीवर, लष्करप्रमुखांची लडाख भेट महत्त्वाची ठरते.

एलएसीवर भारत व चीनमधला तणाव कायम असल्याचा निष्कर्ष अमेरिकेकडून सातत्याने नोंदविला जात आहे. या तणावाचे संघर्षात रुपांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर विभागाशी निगडीत असलेल्या अधिकाऱ्यांनी दिला होता. त्यावर चीनची प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र चीनवर विश्वास न ठेवता लडाख तसेच एलएसीच्या इतर भागांमध्ये पूर्णपणे सज्जता बाळगली जात आहे, अशी ग्वाही भारतीय लष्करप्रमुखांबरोबरच वायुसेनेकडूनही दिली जात आहे.

लष्करप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, माध्यमांशी संवाद साधताना जनरल मनोज पांडे यांनी चीनच्या हेतूवर शंका उपस्थित केली होती. चीनला भारताबरोबरील सीमावाद सोडवायचा नाही, तर सीमावाद धगधगत ठेवण्याची चीनची योजना आहे, असे जनरल पांडे म्हणाले होते. त्यावर चीनची प्रतिक्रिया आलेली नाही. पण यामुळे चीनवर विश्वास ठेवता येणार नाही, हा संदेश जनरल पांडे यांनी देशवासियांना दिला होता. युक्रेनचे युद्ध पेटलेले असताना, भारताने रशियाबाबत स्वीकारलेल्या धोरणांमुळे अमेरिका भारतावर नाराज आहे. याचा फायदा घेण्यासाठी चीनचे परराष्ट्रमंत्री भारतात दाखल झाले होते. त्यांनी सीमावादावर चर्चा कायम ठेवून भारताला व्यापारी सहकार्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव भारताने धुडकावला होता.

यामुळे अस्वस्थ झालेला चीन पुन्हा एकदा भारताच्या एलएसीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच लडाख तसेच एलएसीच्या अन्य भागांमधील भारतीय सैन्याची युद्धसज्जता अत्यंत महत्त्वाची ठरते. लष्करप्रमुखांच्या लडाख भेटीचे महत्त्व यामुळे वाढले आहे. भारत पुढच्या काळातही चीनच्या घुसखोरीला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे, हा संदेश याद्वारे चीनला देण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनीही देशाच्या सार्वभौमत्त्वाला आव्हान देणाऱ्या कुणाचीही गय न करता सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, असे बजावले होते.

पाकिस्तानची माध्यमे देखील इम्रानखान यांना लक्ष करीत आहेत. त्यांच्या बेजबाबदारपणाची मोठी किंमत पाकिस्तानला चुकती करावी लागेल, असे इशारे एकेकाळी इम्रानखान यांचे समर्थन करणारे पत्रकारही देऊ लागले आहेत. सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानची परकीय गंगाजळी जेमतेम दोन महिन्याची आयात करण्याइतकीच असून तिसऱ्या महिन्यात पाकिस्तानची अवस्था श्रीलंकेसारखी होऊ शकते. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व इतर वित्तसंस्थांनी सहाय्य केले नाही, तर पाकिस्तान कोलमडण्याचा धोका निर्माण झालेला आहे.

अशा परिस्थितीत पाकिस्तानचे स्थैर्य व सुरक्षेला इम्रानखान आव्हान देत आहेत. त्याचवेळी पाकिस्तानात चोरांचे सरकार असल्याचा दावा करून असे सरकार सत्तेवर असण्यापेक्षा देशावर अणुबॉम्ब पडला तरी बरे झाले असते, अशी टोकाची भूमिक इम्रानखान मांडत आहेत. यामुळे त्यांच्या दाव्यांकडे दुर्लक्ष करणे पाकिस्तानच्या सरकार व लष्करासाठी अधिकाधिक अवघड बनत चालले आहे. मात्र आपल्याला अटक झालीच तर पाकिस्तानात हाहाकार माजेल, असे संकेत इम्रानखान व त्यांचे सहकारी देत आहेत. इम्रान खान यांच्या पाठिमागे पाकिस्तानचा तरुणवर्ग असून त्यांचे डोके भडकविण्यात इम्रानखान यांना फार मोठे यश मिळत असल्याची चिंता विश्लेषक व्यक्त करीत आहेत. सध्याच्या सरकारवर पाकिस्तानच्या अपयशाचे खापर फोडण्यातही खान यशस्वी झाल्याचा दावा केला जातो.

अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था कायम राखून पाकिस्तानवर आलेल्या आर्थिक संकटाचे निवारण करण्याचे आव्हान पंतप्रधान शाहबाज शरीफ व त्यांच्या सहकाऱ्यांवर आले आहे. त्याचवेळी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांसमोरही इम्रानखान यांना कसे रोखायचे हा प्रश्न खडा ठाकल्याचा दावा या देशाची माध्यमे करीत आहेत.

leave a reply