वायुसेनेसाठी विशेष ‘जीसॅट’ उपग्रहाला संरक्षणमंत्रालयाची मंजुरी

नवी दिल्ली – संरक्षणमंत्रालयाच्या डिफेन्स ऍक्विझिशन कौन्सिलने (डीएसी) वायुसेनेसाठी ‘जीसॅट-७सी’ हा उपग्रह आणि संबंधीत उपकरणांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत यासाठी २ हजार २३६ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता मिळाली आहे. वायुसेनेसाठी सोडण्यात येणार हा ‘जीसॅट’ मालिकेतील दुसरा उपग्रह ठरणार असून यामुळे वायुसेनेचे दळणवळण व संपर्क यंत्रणा अधिकच भक्कम होणार आहे.

वायुसेनेसाठी विशेष ‘जीसॅट’ उपग्रहाला संरक्षणमंत्रालयाची मंजुरीभारतासमोर संरक्षणविषयक आव्हाने वाढत आहे. यामुळे संरक्षणदलांच्या दळणवळण यंत्रणा आणि संपर्क यंत्रणा अधिकाधिक भक्कम करण्याकडेही भर दिला जात आहे. अत्याधुनिक विमाने, जहाजे व शस्त्रांसह रियल टाईम कनेक्टिव्हीटी देणार्‍या उपग्रह आधारीत यंत्रणांचे महत्त्व वाढत आहे. याआधी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) माध्यामातून संरणक्षदलांना बळ पुरवितील असे उपग्रह सोडण्यात आले आहेत. २०१८ साली वायुसेना व लष्करासाठी इस्रोकडून ‘जीसॅट-७ए’ हा उपग्रह सोडण्यात आला होता. तर त्याआधी नौदलासाठीही २०१३ साली जीसॅट-७ हा विशेष उपग्रह प्रक्षेपित केला गेला होता. लवकरच नौदलासाठी ‘जीसॅट-७आर’ हा उपग्रह सोडण्यात येणार आहे.

आता संरक्षणदलांसाठी आणखी एका संचार उपग्रहासाठी संरक्षणमंत्रालयाची मंजुरी मिळाली आहे. वायुसेनेकडून या उपग्रहाचा प्रस्ताव सामोर आला होता. यामुळे कोणत्याही परिस्थितीत व वातावरणात वायुसेनेची संपर्क यंत्रणा सुरळीत सुरू राहण्याची क्षमता वाढणार आहे. मंगळवारी डीएसीच्या बैठकीत वायुसेनेसाठी ‘जीसॅट-७सी’ खरेदी करण्यास मंजुरी मिळाली. तसेच याबरोबर उपग्रह व इतर यंत्रणांशी संपर्क प्रस्थापित रहावा याकरिता आवश्यक असणार्‍या ‘सॉफ्टवेअर डिफाइन्ड रेडिओज्’ (एसडीआरएस) या उपकरणांचीही खरेदी केली जाणार आहेत. याचा एकूण अंदाजे खर्च २ हजार २३६ कोटी इतका असणार असून डीएसीने या खर्चाला मंजुरी दिली आहे.

हा उपग्रह पूर्णपणे भारतीय बनावटीचा असणार असून भारतातूनच सोडला जाईल. इस्रो हा उपग्रह वायुसेनेसाठी सोडणार आहे. दरम्यान, एके-२०३ या रायफलींच्या संयुक्त उत्पदनासंबंधीचा अंतिम करार करण्यास भारत आणि रशियांचा निर्णय झाल्याचे वृत्त समोर येत आहे ६ डिसेंबर रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन भारत दौर्‍यावर येत असून यावेळी या करारावर स्वाक्षर्‍या होतील, असे माहिती मिळत आहे. यानुसार सहा लाख एके-२०३ रायफल भारतात तयार केल्या जाणार आहेत.

leave a reply