अमेरिकेकडून युक्रेनला 27 कोटी डॉलर्सचे नवे ‘मिलिटरी पॅकेज’

वॉशिंग्टन/किव्ह – अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने शुक्रवारी युक्रेनला नव्या संरक्षणसहाय्याची घोषणा केली. हे सहाय्य 27 कोटी डॉलर्सचे असून त्यात चार ‘हायमार्स सिस्टिम्स’ व 500हून अधिक ड्रोन्सचा समावेश आहे. या सहाय्यानंतर अमेरिकेने युक्रेनला दिलेल्या संरक्षणसहाय्याचे मूल्य 8.2 अब्ज डॉलर्सवर गेल्याची माहिती अमेरिकी सूत्रांनी दिली. अमेरिकेच्या ‘नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’चे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी युक्रेनच्या नव्या सहाय्याची घोषणा केली.

अमेरिकेकडून युक्रेनला 27 कोटी डॉलर्सचे नवे ‘मिलिटरी पॅकेज'अमेरिकेने यापूर्वी युक्रेनमध्ये 12 ‘हायमार्स सिस्टिम्स’ तसेच 100हून अधिक ‘फिनिक्स घोस्ट ड्रोन्स’ पाठविले आहेत. त्याव्यतिरिक्त जॅव्हेलिन क्षेपणास्त्रे, ‘हार्पून मिसाईल सिस्टिम’, रायफल्स तसेच तोफा व सशस्त्र वाहनांचाही पुरवठा केला आहे.

leave a reply