आर्मेनिया-अझरबैजानमध्ये नवा तणाव

- सीमेवरील गोळीबारात आर्मेनियन जवानाचा बळी

येरेवान – आर्मेनिया आणि अझरबैजान या मध्य आशियाई देशांमध्ये नव्या संघर्षाचे संकेत मिळत आहेत. अझरबैजानच्या लष्कराने सीमेवर केलेल्या गोळीबारात आपल्या जवानाचा बळी गेल्याचा आरोप आर्मेनियाने केला. तसेच अझरबैजान पुन्हा एकदा इथली स्थिती बदलण्याचा प्रयत्न करीत असल्याचा ठपका आर्मेनियाने ठेवला. अझरबैजानने मात्र आपल्यावरील हे गोळीबाराचे आरोप फेटाळले आहेत.

आर्मेनिया-अझरबैजानमध्ये नवा तणाव - सीमेवरील गोळीबारात आर्मेनियन जवानाचा बळीगेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये संघर्ष भडकला होता. रशियाने मध्यस्थी करून या दोन्ही देशांमध्ये संघर्षबंदी घडविली होती. पण पुन्हा एकदा आर्मेनिया आणि अझरबैजानच्या सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. आर्मेनियाच्या वेरिन शोर्झा या सीमेवर अझरबैजानच्या लष्कराने गोळीबार करून आपल्या जवानाचा बळी घेतल्याचा आरोप आर्मेनिया करीत आहे. या गोळीबारात बळी गेलेल्या आपल्या जवानाचा फोटो आर्मेनियन लष्कराने प्रसिद्ध केला आहे.

अझरबैजानच्या लष्कराने आर्मेनियाचा हा आरोप फेटाळला. तसेच आर्मेनियाने अझरबैजानी लष्कराच्या कालबाजार आणि गाडाबे येथील लष्करी तळांवर गोळीबार केल्याच्या ठपका अझरबैजानच्या संरक्षण मंत्रालयाने ठेवला आहे. आर्मेनियन लष्कराचे रणगाडे आपल्या सीमेवर हल्ले चढवित असल्याचे अझरबैजानच्या लष्कराचे म्हणणे आहे. गेल्या दोन दिवसांतील या घडामोडींमुळे मध्य आशियाई देशांमध्ये पुन्हा संघर्ष भडकण्याची चिंता व्यक्त केली जाते.आर्मेनिया-अझरबैजानमध्ये नवा तणाव - सीमेवरील गोळीबारात आर्मेनियन जवानाचा बळी

अझरबैजान संघर्षबंदीचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप आर्मेनियाने केला आहे. तुर्कीचा पाठिंबा असलेला अझरबैजान बळाचा वापर करून इथली स्थिती बदलत असल्याचा आरोपही आर्मेनियाचे परराष्ट्रमंत्री अरा एवाझियान यांनी केला. इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी बुधवारी राजधानी येरेवानला भेट दिली. या भेटीत परराष्ट्रमंत्री एवाझियान यांनी आर्मेनियाची बाजू मांडून इराणने अझरबैजान आणि तुर्कीविरोधात आपल्याला साथ द्यावी, असे आवाहन केले. तर आर्मेनियाचे संरक्षणमंत्री वाघार्शाक हारूत्यून्यान यांनी बुधवारी रशियन संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांच्याशी चर्चा केली.

leave a reply